Viral video: सोशल माध्यमांवर दिवसभरात अनेक गोष्टी व्हायरल होतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक, भावुक करणारे व्हिडीओ पहायला मिळतात. सध्या असाच एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे.रस्त्यावर एखादा तरुण माणूस भीक मागायला आला तर आपण त्याला म्हणतो की ’हट्टकट्टा तर आहेस, भीक का मागतोस? काम का नाही करत.’ आपला हा फुकटचा सल्ला ऐकून तो एकतर तोंड पाडतो किंवा आपल्यालाच गुर्मी दाखवतो. मात्र एक आजोबा या वयातही कष्ट करताना पाहायला मिळाले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, “जर मावळत्या आयुष्यात अंधारच असेल तर वंशाचे दिवे हवेतच कशाला”

सोशल माध्यमांवर दिवसभरात अनेक गोष्टी व्हायरल होतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक, भावुक करणारे व्हिडीओ पहायला मिळतात. सध्या असाच एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे.रस्त्यावर एखादा तरुण माणूस भीक मागायला आला तर आपण त्याला म्हणतो की ’हट्टकट्टा तर आहेस, भीक का मागतोस? काम का नाही करत.’ आपला हा फुकटचा सल्ला ऐकून तो एकतर तोंड पाडतो किंवा आपल्यालाच गुर्मी दाखवतो. मात्र एक आजोबा उतरत्या वयातही कष्ट करताना पाहायला मिळाले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आजोबा एका लग्न समारंभात ढोल वाजवताना दिसत आहेत. या वयातही आजोबा पोटापाण्यासाठी कष्ट करून पैसे कमावतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ते कधी सर्वांसमोर ढोल वाजवतात तर कधी थकून जमिनीवर बसतात. आपण आजूबाजूला धडधाकट लोक भीक मागताना पाहतो, तरुण मुलं नशेच्या आहारी गेलेली पाहतो. मात्र हे आजोबा अगदी आयुष्याच्या शेवटच्या काळातही स्वत:हा कमवून खात आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोटिवेशन मिळालं आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ lay_bhari_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. अनेकजण यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही जण आजोबांचं कौतुक करत आहेत तर काही जणांनी त्यांच्या मुलांना जबाबदार ठरवलं आहे.

Story img Loader