कडाक्याच्या थंडीत आपला जीव वाचवणे पक्ष्यांसाठी किती जोखमीचे ठरू शकते याची प्रचिती व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला येईल. अनावधानाने ओल्या पायाने स्टीलच्या पाईपवर बसलेल्या फिंच पक्षाचे पाय काही संकदात थंडीमुळे गोठतात. बाहेर कडाक्याची थंडी असल्याने या पक्ष्याचे ओले पाय गोठून पाईपवर घट्ट चिकटतात त्यामुळे फिंचला उडता येत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

VIDEO : पिंज-यातल्या पक्ष्यांना मुक्त करण्यासाठी तिने संग्रहालय विकत घेतले?

हा एवढासा पक्षी उडण्यासाठी धडपड करतो पण त्याला यश मात्र येत नाही. जिव वाचवण्यासाठी तो धडपडतो मात्र प्रत्येकवेळी त्याचे प्रयत्न व्यर्थ ठरतात. एवढ्यात नेल्सन विल्सन या वृद्ध व्यक्तीच्या ते लक्षात येते. गरम पाण्याच्या टबवर एका फ्रिजच्या पाईपवर हा पक्षी चिटकून बसल्याचे त्यांना दिसतो. तेव्हा शक्कल लढवत विल्सन आजोबा अलगतपणे या पक्ष्याला आपल्या मुठीत पकडतात. पाईप आणि बाहेरच्या थंडीमुळे त्याला वाचवणे थोडे अवघड असल्याचे त्यांच्या लक्षात येते. म्हणून त्याला उब देत हळूहळू आजोबा त्याच्या पायावर फुंकर मारतात. असेच बराच वेळ केल्यानंतर श्वासातील गरमीमुळे पायाजवळील बर्फ वितळतो. आजोबा अलगतपणे त्याचे गोठलेले पाय मोकळे करतात आणि या फिंच पक्षाला मोकळे करतात. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आपल्या घोड्याचा शोध घेत असताना विल्सन यांना हा फिंच पक्षी दिसला होता. विल्सन यांनी युट्युबवर याचा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत सहा लाखांहूनही अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

VIDEO : कडाक्याच्या थंडीत उकळलेले पाणीही सेकंदात गोठले

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old man rescue of frozen finch bird