Viral video: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. आयुष्य जगण्यासाठी संघर्ष हा करावाचा लागतो. आयुष्याच्या प्रवासात अनेक वळणे येतात, अनेक चढ-उतारही येतात. इतके संघर्ष, चढ-उतरांसह आयुष्य जगायचे तरी कसे असा प्रश्न अनेकांना पडत असतो. या प्रश्नाचं खरं उत्तर तुम्हाला तेच सांगू शकतात ज्याने आयुष्याचे अनेक उन्हाळे -पावसाळे पाहिले आहे, ज्यांनी आयुष्यात संघर्ष केला आहे. असा आयुष्य जगण्याचा अनुभव असलेल्या एका आजोबांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी येईल तर काहींना खरंच त्यांचे आजोबा आठवतील….
आपल्याला माहिती आहे आजकालची पिढी ही खूप स्मार्ट आहे. आजच्या पिढीला संघर्ष काय हेच माहिती नाहीये. किंबहुना त्यांना संघर्ष करायचाच नाहीये. मात्र एक पिढी अशी होती ज्यांनी संघर्ष केला कष्ट केले त्यामुळे आज आपण छान आयुष्य जगतोय. या व्हिडीओमधले आजोबाही हेच सांगत आहेत. आजोबा सांगतात गरीबीला लाजू नका, गरीबीच तुम्हाला सर्व काही शिकवते. गरीब परिस्थितीत तुम्ही जे शिकता ते कोणत्याच शाळेत किंवा महाविद्यालयात शिकवत नाहीत. पुढे आजोबा म्हणतात, “त्यामुळे ज्याने ठोकर खाल्ली ना तोच कमावतो ज्याने गरीबीत दिवस काढलेत ना त्यालाच गरीबीची किंमत आहे. आणि तोच काहीतरी करतो, बाकी नुसते खायचं, प्यायचं मज्जा करायची. त्यानं गरीबीत दिवस काढलेत, मी रुपया रोजाने काम करेल गावच्या ठिकाणी, दिवसाला १ रुपया रोजानं काम केलेलं आहे.”
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> समुद्रातील झोक्यावर उभी राहून डान्स करत होती तरुणी; पाय घसरला अन्…अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल
हा व्हिडीओ marathi.chhava या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला “गरीबी सर्व काही शिकवते.” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.