Indian Railways Shocking Video : रेल्वे प्रवास हा सोपा आणि सोईस्कर मानला जातो. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही प्रवाशांना अनेक सुविधा दिल्या जातात आणि त्यामुळे प्रवासी आरामात झोपून प्रवास करू शकतात. पण, अनेकदा काही बेशिस्त प्रवाशांच्या धक्कादायक कृत्यांमुळे इतर सर्व प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करण्याची वेळ येते. सध्या सोशल मीडियावर ट्रेनमधील एका प्रवाशाचा असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात तो प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये असे काही कृत्य करतोय की, ज्यामुळे इतर प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

ट्रेनमध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणे कायद्याने गुन्हा आहे; परंतु रेल्वेच्या सर्व नियमांना बगल देत बेशिस्त प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये सिगारेट, बिडी ओढताना दिसतात. अनेकदा अशा प्रवाशांना रोखण्याचा प्रयत्न केल्यास वादाचे प्रसंग निर्माण होतात. त्यामुळे अनेकदा प्रवासी गप्प राहणे पसंत करतात; पण यामुळे सर्वांच्या जीवाला धोका निर्माण होतो. अशा प्रवाशांमुळे धावत्या ट्रेनमध्ये आगीच्या घटनादेखील घडल्या आहेत. पण, तरीही काही मूर्ख प्रवासी यातून धडा घेत नसल्याचे या व्हिडीओतून दिसतेय.

MahaKumbh Mela Viral Girl Monalisa faced harrasement and trouble from people hide under blanket video viral
कुटुंबीयांनी अक्षरश: तिच्या अंगावर चादर टाकली अन्…, कुंभ मेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाची वाईट अवस्था! पाहा धक्कादायक VIDEO
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांनी दावोसमध्ये केले विक्रमी गुंतवणूक करार, कोणत्या शहरात कोणती कंपनी करणार गुंतवणूक?
Government may take control of Saif Ali Khan’s family property in Bhopal under the Enemy Property Act.
Saif Ali Khan Property : सैफ अली खानला धक्का! १५ हजार कोटींची मालमत्ता होऊ शकते जप्त, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
A Punekar young guy lost iPhone in PMT bus
Video : पीएमटी बसमधून प्रवास करताना तरुणाचा आयफोन गेला चोरीला, पुणेकरांनो, काळजी घ्या; व्हिडीओ होतोय व्हायरल
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Viral video of a woman dancing in torn clothes ashleel video viral on social media
“अगं जरातरी लाज बाळग”, एका रीलसाठी महिलेने केलं ‘असं’ काही की…, VIDEO पाहून राग होईल अनावर
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर

धावत्या ट्रेनमध्ये वृद्ध ओढतोय विडी

व्हायरल व्हिडीओमध्ये तुन्ही पाहू शकता की, एक वृद्ध प्रवासी धावत्या ट्रेनमधील बाथरूमबाहेर बसून आरामात विडी ओढताना दिसतोय. त्यामुळे सर्वत्र धूर झाला होता. अनेक प्रवाशांना त्याचा त्रासही होत होता; मात्र कोणीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नाही. अखेर तो प्रवासी उठून विडी ओढण्यासाठी बाथरूममध्ये जात असतो; पण बाथरूम आतून लॉक असल्याने तो पुन्हा खाली बसून आरामात विडी ओढत बसतो. ही घटना मुंबईवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या एक्स्प्रेसमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे.

अनेकांनी हा व्हिडीओ पाहून तीव्र संताप व्यक्त केला आहे. कारण- अशा प्रवाशांच्या एका चुकीने अनेकांना जीव गमवावा लागू शकतो. अनेकदा रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रवाशांना रोखण्याचा प्रयत्न केला जातो; पण हे प्रवासी काही थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. त्यामुळे या घटनेत तुम्हाला काय वाटते नेमकी चूक कोणाची आहे. रेल्वेची की बेशिस्त प्रवाशांची ते आम्हाला कमेंट करून सांगा.

Story img Loader