भारतात अनेक प्रसंगी हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. सण असो किंवा इतर कोणताही धार्मिक कार्यक्रम सर्व जण तो बंधुभावाने साजरा करतात. अनेक प्रसंगी काही लोक या ऐक्याबद्दल चुकीच्या पद्धतीने मेसेज देण्याचा प्रयत्न करतात. पण, आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हायरल झालेला व्हिडीओ दाखवणार आहोत; जो हिंदू-मुस्लिम ऐक्याचे खरोखरच एक अद्भुत उदाहरण आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ट्रेनमध्ये एक वृद्ध मुस्लिम व्यक्ती नमाज अदा करीत आहे; तर दुसरीकडे काही तरुण हनुमान चालिसा पठण करीत आहेत. या व्हिडीओवर आता युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत.
हा व्हिडीओ भारतातील असला तरी तो नेमका कोणत्या ट्रेनमधील आहे हे अद्याप समोर आलेले नाही. ट्रेनमध्ये नमाज आणि हनुमान चालिसा एकाच वेळी पठण केले जात असल्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ट्रेनच्या वरच्या बर्थवर एक वृद्ध मुस्लिम व्यक्ती बसून नमाज अदा करीत आहे. त्याच वेळी बाजूच्या बर्थच्या खालील सीटवर बसून काही लोक हनुमान चालिसाचे पठण करीत आहेत. नमाज आणि हनुमान चालिसा पठण एकाच वेळी सुरू असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे,.अनेक युजर्स याला हिंदू-मुस्लिम ऐक्याचे उदाहरण म्हणत आहेत. पण, हा व्हायरल व्हिडीओ धार्मिक सलोखा आणि आदराचे सार सुंदरपणे प्रदर्शित करणारा असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे.
हा व्हिडीओ Troll Indian Politics नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये “माझा देश बदलत आहे”, असे लिहिलेले आहे. या व्हायरल व्हिडीओवर लोक विविध कमेंट्स करीत आहेत. एका युजरने लिहिले की, हेतू चांगला असेल तर ठीक आहे; पण तो जर चुकीचा असेल तर काही उपयोग नाही. हवे तितके मंत्र वाचा. दुसऱ्या युजरने लिहिले की, काही लोकांना धार्मिक कार्य करताना पाहून त्यांचा धर्म आठवतो.
आणखी एका ट्विटर युजरने लिहिले की, ही प्रार्थना आहे का? हनुमान चालिसा ही केवळ कोणाच्या पूजेत अडथळा आणण्याच्या उद्देशाने मोठ्याने वाचली जात आहे. त्यानंतर चौथ्या एका युजरने लिहिले की, हनुमान चालिसा अतिशय पवित्र आहे; जिच्या वाचनानं मन:शांती आणि आनंद मिळतो. पण, असं कोणाला तरी दाखवायचंय? मी १०० टक्के म्हणू शकतो की, जर हे वृद्ध नमाज अदा करत नसते, तर कोणालाही हनुमान चालिसाची आठवण झाली नसती. त्यावर दुसऱ्या युजरने लिहिले की, मला समजत नाही की काय होत आहे? दोघांनी आपापल्या धर्माचे पालन केलं, तर चांगलंच आहे ना, अशा संमिश्र प्रतिक्रिया युजर्सकडून येत आहेत.
पण ,हा व्हिडीओ कुठला आणि केव्हाचा आहे, यासंबंधित कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक म्हणत आहेत की, जर कोणी प्रार्थना करीत असेल, तर त्याला त्रास देऊ नये. तर काहींचे मत आहे की, दोघेही जण आपापल्या धर्माची प्रार्थना करीत आहेत; मग त्यात काय चुकले