पावसाळा सुरु झाल्यापासून एकीकडे धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे तर दुसरीकडे पावसामुळे नद्या, नाले, ओढे तुंडंब भरून वाहत असल्याचे दिसत आहे. एकीकडे पावासाळ्यातील भेट देण्यासाराख्या धबधब्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे तर दुसरीकडे धबधब्यांवर होणाऱ्या अपघातांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. नद्यांची पातळी धोकादायकरित्या वाढली असूनही अनेकजण स्वत:चा जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात उतरताना दिसत आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर येत आहे तरीही लोकांना अजूनही शहाणपण आलेले दिसत नाही. सध्या अशाच एका व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे ज्यामध्ये पुराच्या पाण्यात उतरलेली वृद्ध व्यक्ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाते. व्हायरल व्हिडिओ पाहून अंगावर काटा येत आहे.

हेही वाचा – Ind vs Sri Lanka T20 : सूर्या-रिंकू मेन बॉलर होताच मीम्सना उधाण; हसणाऱ्या गंभीरलाही केलं लक्ष्य

shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
tourists get stuck in frozen lake in Arunachal Pradesh
गोठलेल्या तलावावर चालताना अचानक बर्फ तुटला अन् पर्यटक अडकले, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
Elderly man beaten by youth Netizens
‘त्यावेळी तुमचा बाप नाही आठवला का रे?’ तरुणांनी केली वृद्ध व्यक्तीला मारहाण; VIDEO पाहून नेटकरी भडकले
Elder man speaks in english shared education importance viral video on social media
मराठी माणसाचा नाद करायचा नाय! आजोबांनी विद्यार्थ्यांसमोर झाडलं इंग्रजी, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल चकित
old cople Video goes viral
“तूपात तूप गायीचे….”, आजोबांनी आजींसाठी घेतला भन्नाट उखाणा, सुंदर नात्याचा Viral Video एकदा बघाच
One mistake and the game is over Young man's unnecessary stunt in the swimming pool viral video will make you shiver
“एक चूक अन् खेळ खल्लास!” स्विमिंग पुलमध्ये तरुणाची नको ती स्टंटबाजी, Viral Video पाहून अंगावर येईल काटा
Pandurang Ulape Kolhapur
“..आणि मृत घोषित करण्यात आलेले आजोबा जिवंत झाले”, कोल्हापुरात घडली अविश्वसनीय घटना

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की एका नदीला पूर आलेला आहे. नदीच्या पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की नदीवरील पुल देखील पाण्याखाली गेला आहे. पुराचे पाणी पुलावरून वाहत आहे तरीही लोक जीव धोक्यात घालून पूल ओलांडताना दिसतात. असाच एक वृद्ध व्यक्ती पुराच्या पाण्यातून पुर ओलंडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पाण्याचा प्रवाहा इतक्या जोरात असतो की वृद्ध व्यक्तीचा तोल जातो आणि तो पाण्यात पडतो. पाण्यात पडताना तो जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीची मदत घेण्याचा प्रयत्न करतो पण तो व्यक्ती त्याची मदत करू शकत नाही आणि शेवटी तो वृद्ध व्यक्ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जातो. त्याचा जीव वाचला की याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही पण लोकांनी अशा प्रकारे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये हाच बोध मिळतो आहे.

हेही वाचा – रील शुट करण्यासाठी खडकावर चढला अन् पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात पडला तरुण, काळजात धडकी भरवणारा Video Viral

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहीला आहे. व्हिडिओ इंस्टाग्रामवर ashwinii_.15
पेजवर पोस्ट केला असून अनेकांनी त्यावर कमेटं केल्या आहेत. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिली की, “त्या माणसाने छत्री हातातून फेकली असती तर बाबाला पाण्यातून वाहताना पकडता आलं असतं” दुसरा म्हणाला की,”चप्पल , छत्री फेकून बाबाचा हात धरणे गरजेचे होते” आणखी एकजण म्हणाला, पण बाबांना एवढी घाई कशाची होती. जीव धोक्यात टाकून नदी ओलाडण्याची काय गरज?

Story img Loader