नोटाबंदीच्या निर्णयाला आता दोन महिने झाले आहे. पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहिर केला होता. देशातील भ्रष्टाचार आणि काळा पैशाला आळा बसेल असे सांगत ५०० आणि १००० रुपायांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या. देशातील परिस्थीती लवकरच बदलेल त्यामुळे जनतेने सहकार्य करावे असे भावनिक आवाहनही मोदींनी केले होते. पण या निर्णयानंतर अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. अजूनही अनेक एटीएममध्ये पैसे उपलब्ध नाहीत. बँका आणि एटीएमच्या बाहेरची गर्दीही बघावी तशी कमी झाली नाही. पुरेसे पैसे नसल्याने उपचार न मिळू शकल्याने किंवा रांगेत उभे राहिल्याने आतापर्यंत १५० हून अधिक लोकांचा मृत्यूही झाला. त्यामुळे विरोधकच काय पण सामान्य नागरिक देखील या निर्णयावर आपला रोष व्यक्त करत आहेत. अशात उत्तर प्रदेशमधल्या एका आजोबांनी चक्क या निर्णयावर त्रस्त होत काही कविता केल्या आहे. या कवितांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुळचे उत्तर प्रदेशमधले असलेले भानू प्रताप सिंह देखील नोटाबंदीच्या निर्णयामुळे त्रस्त झाले आहेत. पण आपला रोष व्यक्त करण्यासाठी त्यांनी दोन कविता केल्या. सध्या नोटाबंदीमुळे देशात जी परिस्थिती आहे ती आपल्या कवितेत आजोबांनी अगदी योग्य शब्दात मांडली. या नोटाबंदीच्या निर्णयानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेला आकांततांडव आपल्या शब्दात मांडायलाही ते विसरले नाही. आपल्या दोन्ही कविता आजोबांनी उत्फुर्तपणे गाऊनही दाखल्या. विजय त्रिपाठी या फेसबुक अकाऊंटवरून आजोबांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला. सोशल मीडियावर तो व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old mans poem on demonetisation is going viral