Viral Video : आई वडील हे प्रत्येकाच्या आयुष्यातील त्या व्यक्ती असतात ज्यांचे उपकार आपण आयुष्यभर फेडू शकत नाही. आपल्या आनंदासाठी ते वाट्टेल ते करतात. मुलांना सुख मिळावे आणि भरपूर यश मिळावे, म्हणून सतत प्रार्थना करतात. आयुष्यभर काबाडकष्ट करणारे हे आईवडील जेव्हा म्हातारपणात थकतात तेव्हा त्यांना आपल्याकडून एकच गोष्ट हवी असते ती म्हणजे वेळ. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल. या व्हिडीओमध्ये बापलेकी संवाद साधताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आजोबा त्यांच्या लेकीबरोबर बसले आहेत. लेक विचारते, “भेटवस्तू काय पाहिजे. सांगा मला काय पाहिजे, सासरहून घेऊन येणार मी आज… काय पाहिजे?” त्यावर आजोबा नकारार्थी मान हलवतात. त्यावर लेक म्हणते, “काही नको?” त्यावर आजोबा म्हणतात, नाही.. तू पाहिजे” तेव्हा लेकीला खूप आनंद होतो आणि ती बाबाला मिठी मारते. हा गोड संवाद ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांचे वडील आठवतील तर काही लोकांना त्यांच्या मुलीची
आठवण येईल.

Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Video Viral
“आयुष्यात कितीही मोठे व्हा पण वडिलांचे कष्ट कधी विसरू नका” बाप लेकीचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO
an old lady burst firecrackers in hand shocking video goes viral on social media
“आज्जी हे चुकीचं आहे” हातात धरून फोडले फटाके, आज्जीचा प्रताप पाहून… VIDEO होतोय व्हायरल
the Indian soldier returned home safely After serving the country for 21 years
२१ वर्ष देशसेवा करून सुखरूप घरी परतला भारतीय जवान, पत्नीचे अश्रु थांबत नव्हते; VIDEO पाहून व्हाल भावुक
Hardworking old women Viral Video
‘गरिबी माणसाला जगणं शिकवते…’ भरपावसात आजींनी असं काही केलं; VIDEO पाहून नेटकरीही झाले भावूक

पाहा व्हायरल व्हिडीओ

mayuri_burangule या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माझे अजोबा कॄष्णा सोपान पोमण,वय वर्ष १०१. आयुष्यभर आपण आपल्या आई वडीलांना काही ना काही मागतच असतो पण त्यांना मात्र फक्त आपला सहवास हवा असतो . तर मग जा. भेटून या ! त्यांना घट्ट मिठी मारून या, कारण आठवण आभास देते पण स्पर्श देत नाही !”

हेही वाचा : VIDEO: एका क्षणाचा राग सगळं उद्ध्वस्त करतो! चिपळूणमध्ये पाण्याची बाटली वेळेवर न मिळाल्याने पाहा तरुणाने काय केले…

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बाप मुलीच्या प्रेमा पोटी भाबडा असतो. हा बाप जपला पाहिजे.” तर एका युजरने लिहिलेय, “तुम्ही फार भाग्यवान आहात तुमचे बाबा आजही तुमच्या बरोबर आहेत. बघून खूप समाधान वाटलं…मी फार कमी वयात माझा बाबा गमावला आहे आणि ती उणीव आयुष्यभर माझ्या मनाला चटका देत राहणार..वाट बघून डोळे पाणवतात पण बाबा दिसत नाही आजूबाजूला. बाबा म्हणजे हिंमत असते बाबा म्हणजे मुलीचं प्रेम असते, बाबा म्हणजे सर्वस्व असते लेकीचं …” आणखी एका युजरने लिहिलेय, “हीच ती शेवटची पिढी आहे की ज्यांना तुम्ही पाहिजे ना की तुमचा पैसा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.