Viral Video : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात आणि विविध राज्यातील विविध जिल्ह्यात वेगवेगळी संस्कृती जपणारे लोक दिसून येतात. महाराष्ट्राच्या विविध भागात वेगवेगळी संस्कृती दिसून येते. खाद्यपदार्थ, बोलीभाषा, नृत्य कला, परंपरा दिसून येतात. महाराष्ट्रातील सहा विभागांपैकी कोकण हा एक विभाग आहे. या विभागात एकूण सात जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकण म्हणजे स्वर्ग होय.

निसर्ग सौंदर्याने नटलेली भूमी म्हणून कोकण ओळखले जाते. कोकणातील माणसं आणि येथील संस्कृती सुद्धा तितकीच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर कोकणातील संस्कृतीचे दर्शन घडवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही वृद्ध लोक कोकणी डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (An old people amazing kokani dance or balya dance or kokan traditional dance video viral on social media)

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
शेवटी लेकच आली मदतीला! पाच मुलं असूनही आई वडीलांवर ही वेळ; वंशाचा दिवा हवा म्हणाऱ्यांनी ‘हा’ VIDEO एकदा पाहाच
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न
Tiger Cubs Hunting Deer In Ranthambore Animal shocking Video
शेवटी रक्त वाघाचं आहे; वाघाच्या पिल्लानं केली भल्यामोठ्या हरणाची शिकार, VIDEO पाहून थक्क व्हाल
Malkin Bai Written behind Car form Pune
प्रेम करावं तर पुणेकरांसारखं! मालकीणबाईसाठी काहीपण, Video Viral एकदा बघाच
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
marathi actress vishakha subhedar dance with niece watch video
Video: “तुमचा वारसा ही पुढे चालवणार”, विशाखा सुभेदारचा भाचीबरोबरचा जबरदस्त डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

हेही वाचा : रस्त्यावरून स्वस्तात मेकअप प्रोडक्टस् खरेदी करणाऱ्यांनो ‘हा’ VIDEO एकदा पाहाच; पुन्हा १० रुपयांची लिपस्टिक घेताना १०० वेळा कराल विचार

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला काही वृद्ध माणसं डान्स करताना दिसेल. त्यांनी एकसारखा पोशाख घातला आहे. डोक्यावर टोपी घातली आहे. प्रत्येकाने एका पायात घुंगरू बांधले आहे आणि घुंगरूच्या तालावर हे सर्व वृद्ध लोक कोकणी डान्स करत आहे. या डान्स प्रकाराला बाला डान्स म्हणतात. वृद्धांची ही ऊर्जा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल की कलेची आवड असावी तर अशी!
या व्हिडीओवर लिहिलेय, “कोकणची शान. ही आपली कोकणची कला आणि शान पुढे टिकवायची आहे”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : माणुसकी मेली..! अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर वेदनेनं ओरडत होता अन् लोकांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल

the_jaypawar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कानावर हे सूर ऐकल्यावर अंग थिरकलच पाहिजे..”
एका युजरने लिहिलेय, “वा! वय मर्यादा पलीकडे फक्त कलेची आवड असली पाहिजे.” तर एका युजरने लिहिलेय, “हे नृत्य जिथे झालं आहे ना ते माझं आजोळ आहे हे गाव. बाला डान्स (नृत्य)” आणखी एका युजरने लिहिलेय, “विचार करा या सगळ्यांनी तरुणपणात किती गाजवला असेल हा नाच..” एक युजर लिहितो, “कलेला वय नाही #_ कोकणकर ” तर एक युजर लिहितो, “कोकण म्हणजे प्रेमाचा महासागर, जसे त्या समुद्राच्या पाण्याचा अंदाज नाही येत, तसेच कोकणी माणसाचे प्रेम आहे, कला आणि संस्कृतीच्या उरात महासागर जपून ठेवलेली लोक म्हणजे कोकण” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader