आजच्या धावपळीच्या जीवनात लोक सतत घाईत असतात. अनेकदा प्रत्येक गोष्टी घाई करण्याच्या नादात लोक स्वत:चे काम वाढवून ठेवतात आणि संकटात अडकतात. म्हणतात, “अती घाई संकटात जाई!” हे उगाच म्हणत नाही. अनेकदा रस्त्यावरही अशा सुचना दिल्या जातात जेणेकरून अपघात टाळता येतील. पण आता बहुदा एटीएमध्येही अशा सुचना लावाव्या लागतील त्याचे झाले असेल एक व्यक्ती चक्क स्कूटरसह थेट एटीएममध्ये घुसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढचं नाही तर तो व्यक्ती एटीएममधून पैसैही काढता दिसत आहे. सध्या या व्यक्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral photo) होत आहे जो पाहून लोकांना हसू आवरता येईना.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल फोटोमध्ये स्कूटरवर स्वार झालेला एक व्यक्ती एटीएममधून पैसे काढत असल्याचे दिसत आहे.” फोटोमध्ये एक व्यक्ती स्कूटरवर स्वार होऊन थेट एटीएममध्ये घुसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्या व्यक्तीने स्कूटररसह एटीएमध्ये प्रवेश केल्याचे दिसून येते. फोटो पाहिल्यानंतर लोकांच्या मनात एकच गोष्ट येत आहे की, “एवढी घाई कशासाठी”

हेही वाचा – Gulab Jamun Latte: तुम्ही कधी गुलाबजाम कॉफी प्यायली आहे का? नसेल तर हा व्हायरल व्हिडीओ पाहा

हेही वाचा – नारळाच्या करवंटी फेकून देऊ नका? तयार करा सुंदर अंगठीचा बॉक्स; पाहा व्हायरल व्हिडीओ

हा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @dekhane_mukul नावाच्या अकाऊंटसह शेअर केला गेला आहे. फोटो शेअर करताना, ‘ही व्यक्ती विशेष भारतरत्न पुरस्कारासाठी पात्र आहे’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. १३ डिसेंबर रोजी शेअर केलेली ही पोस्ट आतापर्यंत २१ हजार लोकांनी पाहिला आहे. पोस्टला लाईक आणि शेअरही केले जात आहे. लोक या पोस्टवर विविध प्रकारच्या कमेंट्स करून मजाही घेत आहेत. एकाने लिहिले, “घाईत असेल बिचारा” दुसऱ्याने लिहिले, “बँकेची चूक आहे तिथे एकही सिक्युरिटी गार्डन नाही” तिसरा म्हणाला, “याला एटीएम रत्न पुरस्कार द्या.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old photo of man on scooter withdrawing money go viral on internet snk
Show comments