शेतकरी आंदोलनाला शनिवारी सात महिने पूर्ण झाले. मागील सात महिन्यांपासून केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंदोलन केलं जात आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधामुळे आणि त्यांनी दिल्लीमध्ये प्रवेश करु नये म्हणून पोलिसांनी दिलेल्या सिमांवर तटबंदी उभारल्याचंही दिसून आलं. याचदरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अटक झाल्याच्या अफवाही पसरली होती. मात्र नंतर टिकैत यांना अटक करण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालं. शेतकरी आंदोलनातील काही नेत्यांच्या दाव्यानुसार टिकैत हे शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने नसल्याचा आरोप केला जातो. या वरुनच समाजवादी पक्षाचे नेते आय. पी. सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.
नक्की वाचा >> “म्हणजे तुम्हाला चहा सुद्धा नीट बनवता येत नव्हता?”; मोदींना त्या आठवणींवरुन नेत्याने लगावला टोला
सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानात बसल्याचं दिसत आहे. मोदींसोबतच उद्योगपती गौतम अदानीसुद्धा या विमानातून प्रवास करत असल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सिंह यांनी. “टिकैत शेतकऱ्यांचं हित जपणारे नेते नाहीत, अदानींच्या विमानामधून उड्डाण करणारे हे सज्जन शेतकऱ्यांचे हितचिंतक आहेत,” असा टोला लगावला आहे. विमानात काढलेला हा फोटो १८०० हून अधिक वेळा शेअर करण्यात आला असून एकूण ८ हजारहून अधिक जणांनी हा फोटो लाईक केलाय. सध्या हा फोटो सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे.
टिकैत किसान हितैषी नहीं हैं, अदानी के विमान से हवा में उड़ रहे यह सज्जन किसान हितैषी हैं। pic.twitter.com/RVp7ViPNxV
— I.P. Singh (@IPSinghSp) June 27, 2021
सिंह यांनी मोदींवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. काही दिवसांपूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ एप्रिल २०१४ रोजी केलेल्या भाषणातील एक जुनं वाक्य व्हायरल झालं होतं त्यावरही प्रतिक्रिया दिली होती. नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांदरम्यान लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना, मी लहानपणी रेल्वे स्थानकांवर चहा विकायचो असं म्हटलं होतं. एएनआयने यासंदर्भातील एक ट्विट २१ एप्रिल २०१४ रोजी केलं होतं. ज्यामध्ये मोदींनी, आजही माझ्या लक्षात आहे की जेव्हा मी एखाद्याला थंड चहा द्यायचो तेव्हा मला कानाखाली मारली जायची. त्या जखमा आजही आहेत, असं म्हटलं होतं.
Aaj bhi yaad hai jab kisi ko chai thandi deta tha to chaanta padta tha, vo ghaav ab bhi hai-Modi
— ANI (@ANI) April 21, 2014
हे ट्विट रिट्विट करुन आय. पी. सिंह यांनी, “म्हणजे तुम्हाला चहा सुद्धा नीट बनवता येत नव्हता?”, असा टोला मोदींना लगावला आहे.
मतलब आप चाय तक ठीक से नहीं बना पाते थे? https://t.co/KsytQZX8UU
— I.P. Singh (@IPSinghSp) June 8, 2021
इतरही अनेकांनी आता हे ट्विट कोट करुन रिट्विट करत यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता सिंह यांनी पुन्हा मोदींचा जुना फोटो ट्विट केल्यानंतर त्यावरही अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात.