सातारकर आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठीच… सातारकरांसाठी आज आम्ही काही जुन्या आठवणी घेऊन आलो आहोत, हे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सातारा जिल्हा हा पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्यांपैकी एक आहे. सर्वत्र आता शहरीकरण झाल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच गावाकडची जास्त ओढ असते. मात्र, वास्तव पाहायला गेलं तर आता गावोगावीही शहरीकरण पाहायला मिळतं. पहिल्यासारखे जुने वाडे, मातीची घरं आता पाहायला मिळत नाहीत. गावीही शहरासारखीच सिमेंट कॉंक्रीटची जंगले दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुनं तेच सोनं

जुन्या पिढीला मात्र जुनं ते सोनं आजही आवडतं. आजच्या पिढीला त्या जुन्या गोष्टींची ओढ नाही, कारण त्यांनी ते अनुभवलेलच नाही. मात्र, आता पूर्वीच्या जुन्या साताऱ्यातील काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला विश्वासच बसणार नाही की, हे शहरीकरण होण्याआधीचं सातारा शहर इतकं सुंदर होतं. हे फोटो पाहून प्रत्येक सातारकराला मनापासून आनंद होईल. विशेषत: जुन्या पिढीला पूर्वीचं सातारा शहर पाहून खरंच भरून येईल. तुम्हीही सातारकर असाल तर हा व्हिडीओ नक्की पाहा…

प्रत्येक सातारकराला वाटेल अभिमान…

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये साताऱ्याची काही जुनी छायाचित्रे पाहायला मिळत आहेत. यामध्ये सातारची जुनी बाजारपेठ, राजवाडा सातारा, अंजिक्यतारा, वाईचं जुनं महागणपतीचं मंदिर, महाबळेश्वरचं प्रसिद्ध मंदिर, जुने पंचगंगा मंदिर, आदर्की कोयना एक्सप्रेस या सर्व ठिकाणचे जुने फोटो पाहायला मिळत आहेत. जुन्या पिढीला आता हे फोटो पाहून त्यांचे जुने दिवस, बालपणीचे दिवस नक्की आठवतील.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> क्रूरतेचा कळस! …म्हणून ठाण्यात सुनेकडून सासूला बेदम मारहाण; संतापजनक Video व्हायरल

सातारा या भूमीला सांस्‍कृतिक वारसा लाभलाय हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. जिल्‍ह्यातील कित्‍येक थोर योद्धे, राजे, संत आणि थोर व्‍यक्तिमत्‍वांनी महाराष्‍ट्राचा इतिहास घडवला आहे. शिवाजी महाराजांच्‍या सत्तेच्‍या काळातील सर्वात मोठ्या घडामोडी या पुणे आणि सातारा या परिक्षेत्रातच विशेष करून सह्याद्रींच्‍या पर्वत रांगांभोवतीच घडल्‍या. जिल्‍ह्याचा पश्चिमेकडील भूभाग पूर्णतः घनदाट जंगले, उंच टेकड्यांनी व्‍यापलेला असल्‍या कारणाने शिवाजी महाराजांनी तिथे सुमारे २५ किल्‍ले स्‍थापन केले. त्‍यांनी संपूर्ण आयुष्‍यभर आदिल शहा व मुघलांशी लढा दिला.‍

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old satara photo viral on social media satara district information in marathi srk
Show comments