सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे तर काही संताप आणणारे असतात. सध्या असाच एक संतापजनक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन महिला पोलिस एका वृद्ध व्यक्तीला काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या महिला पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिला पोलिसांनी ज्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली आहे, ते शिक्षक आहेत. याबाबतची माहिती एका हिंदी वृत्तवाहिनीने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील कैमूर येथील दोन महिला पोलिसांनी रस्ता ओलांडणाऱ्या एका वयस्कर शिक्षकांना मारहाण केली. व्हिडीओमध्ये वृद्ध व्यक्ती त्या पोलिसांना, ‘मला का मारताय ? मी काय चुक केली आहे, मला सांगा, मी सायकलवरून रस्ता ओलांडत होतो,’ असं म्हणताना दिसत आहे. पण या महिला पोलिसांनी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता त्याला मारल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
रिपोर्ट्सनुसार, दोन्ही महिला पोलिस ६५ वर्षीय शिक्षिकेला काठीने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या घटनेतील, नंदिनी कुमारी आणि जयंती कुमारी नावाच्या महिला पोलिसांना ३ महिन्यांसाठी निलंबित केलं आहे. याबाबतची माहिती एसपी ललित मोहन शर्मा यांनी दिली आहे.
हेही पाहा- १०८ किलो वजन कमी करुनही अनंत अंबानीचे वजन पुन्हा कसे वाढले? ‘ही’ कारणे जाणून तुम्हीही थक्क व्हाल
शाळेतून घरी परतताना मारहाण-
घटनेतील पीडित व्यक्ती शाळा सुटल्यानंतर घरी जात होते यावेळी मंडल कारागृहाजवळील रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झाले होते. यावेळी दोन महिला पोलिस वाहतूक सुरळीत करण्याचं काम करत होत्या. यावेळी वृद्ध शिक्षकाने पायी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.