आतापर्यंत ट्रेनने अनेकदा प्रवास केला असेल. अनेकांना ट्रेनमध्ये प्रवास करणे आरामादायी वाटते. पण तुम्ही ट्रेनमध्ये राहणारे लोक पाहिले आहे का? होय तुम्ही योग्य तेच वाचत आहात. ट्रेनमध्ये राहणारे लोक, तेही सर्व सुख सोयींसह. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे,ज्याचे रुपांतर एका घरामध्ये केले आहे. या ट्रेन कोचमध्ये घरात असतात तसे बेड, एसी अशा सर्व सुखसोयी देखील उपलब्ध आहे. एका जुन्या भारतीय रेल्वे कोचला सर्जनशीलपणे एका घरात रुपांतरीत केले गेले आहे. हा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे.

अजित सिंग (@ajeet.thakur._0735) यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ सुरु होतो तेव्हा तो एका बंद पडलेल्या ट्रेनच्या डब्याबाहेर उभा असल्याचे दिसते. तो हसत आत जातो आणि प्रवेशद्वारावरच, १० लिटरच्या अनेक मोठ्या पाण्याच्या बाटल्या व्यवस्थित ठेवलेल्या दिसतात. ट्रेननमध्ये असलेल्या, नेहमीच्या स्लीपर बर्थची जागी बेड ठेवलेले दिसत आहे, ज्यामध्ये गाद्या, उशा, बेडशीट आणि ब्लँकेट देखील आहेत.

पार्श्वभूमीत व्हिडिओ शुट करणाऱ्या व्यक्तीचा आवाज ऐकू येईल, “तिथे सोफा देखील आहे. हे पूर्ण घरासारखे आहे. ट्रेन कोचमध्ये असलेल्या आरामदायी सोयी सुविधा पाहून तो प्रभावित झाला आहे.

तो शुटींग करताना अनोख्या घराची अधिक माहिती देतो, त्यात भिंतीवर लटवलेले कपडे, छतावरील पंखे, कूलर, एसी, पडदे, गालीचे, योग्य लाइट आणि अगदी कपाट देखील असल्याचे सांगतो. ही केवळ तात्पुरती व्यवस्था नाही; ती खरोखरच एखाद्याच्या पूर्णवेळ निवासस्थानासारखी वाटते.

व्हायरल व्हिडिओ पहा:


दुसऱ्या व्हिडीओमध्ये अजित तिथे राहणाऱ्या पुरुषांबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. कोचमध्ये एक टेलिव्हिजन, अनेक खुर्च्या आणि बरेच वॉटर कूलर आहेत – ज्यामुळे ते जुन्या ट्रेनपेक्षा हॉस्टेल किंवा शेअर्ड अपार्टमेंटसारखे वाटते.

व्हिडिओला दहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि त्यावरच्या कमेंट्सही तितक्याच मनोरंजक आहेत. एका युजरने म्हटले आहे, “येथे काम करण्यासाठी काय करावे लागेल.” दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे लोक किती हुशार आहेत – ते कोण आहेत आणि असे लोक कुठून येतात?”
तिसरा म्हणाला की, “बाहेर एकदम भंगार असल्यासारखे वाटते आतून एकदम आलिशान आहे”

इतरांनी या कल्पनेचे कौतुक केले आणि जुन्या डब्याचा चांगला पुनर्वापर केला असे म्हटले. एका कमेंटमध्ये म्हटले आहे, “ट्रेन मुलांचे वसतिगृह झाले आहे.”

पाचवी व्यक्ती म्हणाली, “रेल नीरची इथेही जास्त किंमत आहे का?”