सध्या सोशल नेटवर्किंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची अनेक जुनी वक्तव्य व्हायरल होताना दिसत आहेत. अशाच व्हायरल होणाऱ्या वक्तव्यांमध्ये आणखीन एका वक्तव्याची भर पडली आहे. सध्या चर्चेत असणाऱ्या या वक्तव्यात मोदींनी लहानपणी चहा विक्री करण्यासंदर्भातील एका प्रसंगाबद्दल माहिती दिली होती. चहा थंड असेल तर मला ग्राहक कानाखाली मारायचे असा दावा मोदींनी केला होता. एएनआय या वृत्तसंस्थेने पंतप्रधान मोदींच्या भाषणातील हे वाक्य ट्विट केलं होतं. जवळजवळ सात वर्षांपूर्वी ट्विट केलेलं हे वाक्य पुन्हा एका चर्चेत आलं आहे. लोकं हे वाक्य शेअर करत मोदींवर टीका करत असतानाच समाजवादी पक्षाचे नेते आय. पी. सिंह यांनीही हे ट्विट रिट्विट करुन मोदींना टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एएनआयने २१ एप्रिल २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांदरम्यान लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना, मी लहानपणी रेल्वे स्थानकांवर चहा विकायचो असं म्हटलं होतं. एएनआयने यासंदर्भातील एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये मोदींनी, आजही माझ्या लक्षात आहे की जेव्हा मी एखाद्याला थंड चहा द्यायचो तेव्हा मला कानाखाली मारली जायची. त्या जखमा आजही आहेत, असं म्हटलं होतं.

हे ट्विट रिट्विट करुन आय. पी. सिंह यांनी, “म्हणजे तुम्हाला चहा सुद्धा नीट बनवता येत नव्हता?”, असा टोला मोदींना लगावला आहे.

इतरही अनेकांनी आता हे ट्विट कोट करुन रिट्विट करत यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केलीय. पाहुयात काही ट्विट…

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)


आय. पी. सिंह यांनी केलेल्या ट्विटला एक हजार जणांनी लाईक केलं आहे.