Old man video viral: सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. काहींमध्ये लोक विचित्र काम करत राहतात. आजकाल सोशल मीडियावर अनेकजण माईकद्वारे लोकांच्या मुलाखती घेत असतात. या व्हिडिओंमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींबद्दल बोलत असतात. आणि त्याच्या बोलण्यातल्या काही गोष्टी अशा असतात ज्या काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती शायरी बोलताना दिसत आहे. आजोबांची ही शायरी ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल.

आयुष्यातील उतार वयात वृद्ध लोक बराचसा वेळ हा आपल्या नातवंडात घरीच घालवणे पसंत करतात, आराम करतात. मात्र काही या आजोबांसारखे असतात शेवटच्या श्वासापर्यंत स्वत:चा पिंड काही सोडत नाहीत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक वृद्ध दिसत आहे. जो मायक्रोफोन धरलेल्या व्यक्तीशी बोलताना दिसत आहे. आजूबाजूला जाणाऱ्यांची मोठी गर्दी असते. जे वृद्धांना प्रोत्साहन देत आहेत. दरम्यान, हे आजोबा आपली भन्नाट शायरी ऐकवू लागतात. शायरीच्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत, ‘लाल लाल गाल पर जो देख लिया तिल रे गोरे गोरे कदमों पर फेंक दिया दिल रे. गोरे-गोरे बालमा ने देखे हंस हंस के प्रेम रोग जाल से बेचारा मरी फंस के.सैर दिल्ली का करता हूं मगर दिलदार नहीं मिलती है ताजमहल बनाना चाहता हूं मगर मुमताज नहीं मिलती है.’? विशेष म्हणजे या आजोबांचं वय इतकं झालंय की त्यांना दातही नाहीत, पण शायरी खूप छान शैलीत ते बोलत आहे. आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनीही आजोबांच्या या शायरीलाला दाद दिली. आजोबांच्या शायरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हेच खरं सुख! बोरला पाणी लागल्यानंतर शेतकऱ्याला झालेला आनंद; VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

लोक मजेशीर कमेंट करत आहेत

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर @ChapraZila नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत जवळपास २२ हजार वेळा पाहण्यात आले आहे. यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यावर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘वाह व्वा, कोण म्हणते की म्हातारे प्रेम करत नाहीत.’ आणखी एका युजरने लिहिले आहे, ‘जिओ अंकल.’ आणखी एका यूजरने भोजपुरीमध्ये कमेंट करत लिहिले की, ‘तुम्ही जर म्हातारपणी असे आहात तर तारुण्यात कसे असाल.

Story img Loader