निसर्गात एकापेक्षा एक आश्चर्य दडलेली आहेत. सागरीजीवसृष्टीबद्दल तर आजही अनेक रहस्य उलगडलेली नाहीत. एक सागरीजीव तर विना ऑक्सिजन जगतो. तर काही जीव हे पाण्यासारखे पारदर्शी आहेत. असे प्राणी देखील आपल्या पृथ्वीचा एक भाग आहेत यावर लोकांचा विश्वास नाही. जेव्हा जेव्हा समुद्रातील प्राण्यांची चर्चा होते, तेव्हा मासे सोडून ऑक्टोपस या प्राण्याची चर्चा नक्कीच होते. दिसायला विचित्र दिसणारा हा प्राणी तरीही खूप खास आहे. या प्राण्यामध्ये असे अनेक रहस्य आहेत, ज्याबद्दल तुम्ही अनभिज्ञ आहात. स

ध्या ट्विटरवर अशाच एका अनोख्या ऑक्टोपसच्या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये हा ऑक्टोपस एखाद्या फुग्यासारखा फुगताना दिसत आहे. हा फुगणारा ऑक्टोपस पाहून लोक आश्चर्यचकित होऊ लागले आहेत.

ऑक्टोपस सुंदर पण विचित्र प्राणी आहेत. त्यांच्याकडे स्व-संरक्षणाच्या विविध पद्धती असतात. कुणी शाई सोडून तर कुणी स्वतःचे हातपाय देखील कापून टाकू शकतात. पण आणखी एका निराळ्या ऑक्टोपसची चर्चा सुरूय. हा ऑक्टोपस एखाद्या फुग्यासारखा फुगताना दिसतोय. हा व्हिडीओ तसा फार जुना आहे. पण तो सोशल मीडियावर पुन्हा नव्याने व्हायरल होऊ लागलाय. समुद्राच्या खाली सुमारे १,६०० मीटर खोल अंतरावर हा ऑक्टोपस एक ‘डिफेन्सिव्ह बलून’ तयार करताना दिसतोय.

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

हा ऑक्टोपस स्वतःच्या संरक्षणासाठी असा फुगा तयार करत असतो. यालाच डिफेन्सिव्ह बलून असं म्हणतात. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. हा व्हिडीओ सुरूवातीला Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला होता. २०१९ मध्ये शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. फुगल्यानंतर हा ऑक्टोपस खूपच मोठा दिसतोय. असा ऑक्टोपस पहिल्यांदाच पाहत असल्याच्या प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहेत. 

हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला रेडिटवर ३,५०० अपवोट्स मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काहींनी आश्चर्य व्यक्त करत समुद्राखालील राक्षस असं वर्णन केलंय. 

Story img Loader