आपल्या देशात रस्त्यांवरील अपघात हे नेहमीचेच आहेत. दररोज अपघातात मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होतो. असं असूनही लोक वाहतुकीचे नियम नीट पाळत नाहीत. इथे अजूनही लोक सीट बेल्टला महत्त्व देत नाहीत. आज आपण अशा व्हिडीओबद्दल बोलणार आहोत, ज्यात माणसाकडून चूक झाली, पण ‘स्पेशल बेल्ट’मुळे गाढवाचा जीव वाचला.
या व्हिडीओमध्ये एक गाढव आणि त्याचा स्वार रस्त्यावरून गाडी ओढताना दिसत आहेत. अचानक मागून आलेल्या एका कारने या गाढव गाडीला धडक दिली. ही टक्कर इतकी जोरदार असते की गाढवाचा तोल जातो. गाढव आणि गाडी रस्त्याच्या पलीकडे पोहोचली. मात्र लगामच्या मदतीने गाढवस्वाराने गाढवाचे प्राण वाचवले. ही घटना पाहून आजूबाजूचे लोक हादरले. गाडी चालवताना बेल्ट बांधलात तर जगण्याची शक्यता असते हा धडा हा व्हिडीओ देतो. गळ्यातल्या पट्ट्यामुळे या गाढवाचा जीव वाचला. त्यामुळे आपणही या प्राण्याचा संदेश समजून घेऊन आपल्या जीवनात अंगीकारला पाहिजे जेणेकरून तुम्ही आणि मी सुरक्षित राहू शकू. असं देखील काही यूजर्स म्हणत आहेत.
हा व्हिडीओ ट्विटरवर Hasna Zaroori Hai नावाच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिली आहे. ‘गाढवाला सीटबेल्टने वाचवले नाहीतर कार चालकाने मारूनच टाकलं असतं.’ असं कॅप्शनमध्ये लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करू लागले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ३१ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : या मुलाने घराची भिंत नव्हे, वही किंवा कागद नव्हे तर पांढरी शुभ्र कार रंगवली!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : शार्कसोबत पाण्यात रोमँटिक डान्स करताना दिसला हा माणूस, VIRAL VIDEO पाहून हैराण व्हाल!
एका यूजरने लिहिले की, “गाढवाने ज्या पद्धतीने त्याला कोणी मारले आणि काय झाले हे तपासण्यासाठी ज्या पद्धतीने मागे फिरले, ते आश्चर्यकारक होते. “दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘या प्राण्यांचं दुःख माणसाला कसं नाही समजत?’ दरम्यान, आणखी एका ट्विटर यूजरने गाढव गाडीच्या गुणवत्तेची प्रशंसा केली. एका कारची एवढी जोराची धडक बसली की त्याने मागच्या पायावर धावणाऱ्या गाढवाला पलीकडे ढकलले, तरीही गाडीचे नुकसान झाले नाही.’