मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एका ३४ वर्षीय व्यक्तीला अर्धनग्न अवस्थेत मारहाण, धक्काबुक्की करण्याचा आणि तोंडाने बूट उचलायला लावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ २०२१ चा असून आता हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओत पीडित व्यक्तीचे हात बांधले असून, अर्धनग्न अवस्थेत उभा असल्याचं दिसत आहे. यावेळी आरोपी त्याला सतत मारहाण करत होता. तर दुसरीकडे, पीडित व्यक्ती वारंवार दयेची मागणी करत होता. पण आरोपी काहीही ऐकून न घेता त्याचा छळ करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ रेवा जिल्ह्यातील पिपराही गावात मे २०२१ रोजी रेकॉर्ड करण्यात आला आहे.

पोलिसांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार संपत्तीच्या वादातून ही घटना घडली असल्याचा अंदाज आहे. “व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्ही मुख्य आरोपी जवाहर सिंह आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे,” अशी माहिती रेवाचे पोलीस अधिक्षक विवेक सिंग यांनी दिली आहे. प्रमुख आरोपी गोंड जमातीचा सदस्य आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्य आरोपी हा गावच्या सरपंचाचा पती आहे आणि तो सरकारी शाळेत क्लर्क म्हणून नोकरीला आहे. पीडित व्यक्तीचं आरोपी जवाहर सिंगने अपहरण केलं होतं. यानंतर त्याला अर्धनग्न करत मारहाण केली आणि तोंडाने बूट उचलायला लावलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: दिल्लीत हिंडन नदीच्या पुरामुळे भयानक परिस्थीती; तब्बल ४०० हून अधिक गाड्या पाण्याखाली

जवाहर सिंह याच्यासह त्याच्या दोन सहकाऱ्यांविरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदिवासी असून, उच्च जातीतील आहे. आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत.