उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे तुम्ही पाहिले असतील. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी आपल्यापैकी अनेक जण विकेंडला निसर्गरम्य परिसरात जातात. प्रामुख्याने हे धबधबे पावसात पाहायला खूप मजा येते. कारण ते अक्षरश: दुथंडी भरून वाहातात. पण तुम्ही कधी ढगांचा धबधबा पाहिला आहे का? पाहिला नसेल तर हा व्हिडीओ पाहा. असं दृश्य यापूर्वी तुम्ही कधीच पाहिलं नसेल. हे ढग अगदी धबधब्याप्रमाणे दुथंडी भरून वाहताना दिसत आहेत. ढगांच्या धबाधब्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मिशिगन लेकमधला आहे. या व्हिडीओमध्ये कैद झालेले दृश्य पाहून सारेच जण थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ तसा फार जुना आहे. परंतू तो नव्याने सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्‍ये पाण्याचा विस्तीर्ण पसरलेला भाग ढगांनी झाकलेला होता. ढगांची एक मोठी लाट पाण्यावर वाहताना दिसून येतेय. यांना रोलिंग क्लाऊड असं म्हणतात.

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Worlds Longest Train: ही आहे जगातील सर्वात लांब पॅसेंजर ट्रेन, जाणून घ्या

आणखी वाचा : आपल्याच छाव्यांपासून दूर पळू लागला सिंह, पाहा हा गोंडस VIRAL VIDEO

हा व्हिडीओ उत्तर अमेरिकेतील पाच मोठ्या तलावांपैकी एक असलेल्या मिशिगन सरोवरमधील आहे.लाटेप्रमाणे वाऱ्याच्या बरोबरीने हे ढग पुढे सरकले होते. हा टाइम-लॅप्स व्हिडीओ रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला. त्यानंतर तो बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात पाहत असून निसर्गाचं असं रूप पाहून सुखावल्याची भावना व्यक्त करत आहेत. 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old video of rolled cloud in lake michigan goes viral watch prp