Kapil Dev Dance Viral Video: भारतीय क्रिकेटमधील सर्वात दिग्गज ऑलराउडर कपिल देव (Kapil dev) यांनी ६ जानेवारी २०२४ रोजी त्यांचा ६५ वा वाढदिवस साजरा केला. कपिल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ साली सर्व प्रथम वर्ल्डकप जिंकला होता. १९८३ च्या विश्वचषकात कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने प्रथमच आयसीसीचे विजेतेपद पटकावले होते. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील विश्वचषक विजयाने भारतीय क्रिकेटला एक नवा मार्ग दाखवला होता. त्यामुळेच देशभरात त्याचे अनेक चाहते आहेत, ज्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते ‘गुलाबी आँखे’ या गाण्यावर पत्नीबरोबर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कपिल देव त्यांच्या पत्नीबरोबर एका स्टेपमध्ये डान्स करताना दिसत आहेत. कपिल देव यांचा हा डान्स आता सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. कपिल देव यांच्या चाहत्यांची संख्याही खूप मोठी आहे. त्यांच्यावर खास पोस्ट करत शुभेच्छांचा वर्षाव सरुच आहे. त्यांचे चाहतेही या व्हिडिओला खूप पसंती देत असून अनेकांनी यावर आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. १९७८ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या त्याच्या डेब्यू मॅचमध्ये कपिल देव यांना त्यांच्या मित्रांनी सरप्राईज पार्टी दिली होती. मात्र, त्यांनी वाढदिवसानिमित्त सेलिब्रेशनचे कोणतेही विशेष नियोजन केले नव्हते आणि तो दिवस घरीच घालवला होता.

(हे ही वाचा: ‘इन्स्टाग्राम वाली बहू’ का होतेय ट्रेंड? सोशल मीडियावर गाण्यानं उडवून दिली खळबळ; Video होतोय Viral)

येथे पाहा व्हिडिओ

कपिल देव हे क्रिकेट विश्वामधील एक नावाजलेले नाव असून, कपिल देव यांना क्रिकेटमध्ये महत्तम व सन्माननीय स्थान प्राप्त आहे. कपिल देव हे भारतीय क्रिकेट विश्वातील महान खेळाडूंपैकी एक आहेत. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. त्यांचे उल्लेखनीय नेतृत्व, अष्टपैलू कौशल्याने जगभरातील क्रिकेट रसिकांच्या हृदयात त्यांनी विशेष स्थान निर्माण केले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old video surfaced on social media in which kapil could be seen dancing on the song gulabi aankhen with his wife pdb