Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. त्यातील एखादाच व्हिडीओ खूप चर्चेत येतो आणि अनेक वर्षे तो लोकांच्या लक्षातही राहतो. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्या व्हिडीओनं काही वर्षांपूर्वी काळ गाजवला होता.

सध्या फाइव्ह जी, फोर जीचा (5G, 4G) काळ सुरू असून, जास्तीत जास्त लोक अॅण्ड्रॉईड मोबाईल वापरतात. अॅण्ड्रॉईड मोबाईलपूर्वी कॅमेरा असलेला बटणांचा फोन वापरला जायचा. पण, आता अॅण्ड्रॉईड मोबाईलमुळे अनेक नवनवीन गोष्टी, सोशल मीडियाबद्दलची माहिती लोकांना मिळू लागली. याच मोबाईलमुळे आता लोक सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात; ज्यावर रील्स, गाणी, रेसिपी, प्रवास यांसारख्या अनेक विषयांसंबंधित माहिती शेअर करतात. पण, आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो 2G च्या काळातील आहे. त्यावेळी सोशल मीडियाचा वापर केला जात नसूनही तो खूप व्हायरल झाला होता.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Telangana Cop Killed by Brother Over Inter-Caste Marriage
Telangana Cop Murder : ऑनर किलिंग, संपत्तीचा वाद की…, पतीशी फोनवर बोलत असताना महिला पोलिसाची भावाकडून हत्या
Video : konkani young guy dance so gracefully
“आपली संस्कृती दाखवायला लाजायचं नाही!” कोकणी तरुणाने केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Punekars Puneri pati viral for parking in his spot funny puneri pati goes viral on social media
PHOTO: “वेळ कधी सांगून येत नाही…” गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांसाठी लावली खास पुणेरी पाटी; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगा ‘विसरू नको रे आई-बापाला’ हे गाणं गाताना दिसत आहे. या गाण्यातील त्या मुलाचा आवाज आजही अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणतो. या व्हिडीओ काही वर्षांपूर्वी खूप व्हायरल झाला होता. त्याशिवाय या व्हिडीओमुळे त्या मुलाचं कौतुकही करण्यात आलं होतं. आतादेखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा चर्चेत आला आहे.

हेही वाचा: कोणाच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेऊ नका… मगरीनं डिवचल्यानं हत्ती संतप्त… पुढे असं काही घडलं; पाहा थरारक VIDEO

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @varkarichava या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास दोन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास दोन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “या मुलामुळे मी खूप शिव्या खाल्ल्या होत्या लहानपणी.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “खरंच हा व्हिडीओ त्या काळी खूप व्हायरल झाला होता.” तर आणखी एकानं लिहिलंय, “एक नंबर आवाज आहे याचा.”