Viral Video : सध्या पावसाळा सुरू आहे आणि सोशल मीडियावर जो तो पावसाळी गाण्यावर रिल्स किंवा व्हिडीओ बनवताना दिसत आहे. अशातच सध्या ‘बादल बरसा बिजुली’ हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.
सध्या असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये या गाण्यावर चक्क वृद्ध महिला डान्स करताना दिसत आहे.
‘बादल बरसा बिजुली’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर खूप फेमस झालंय. या गाण्यावर वृद्ध महिलांनी खूप सुंदर डान्स केलाय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की सात महिलांचा ग्रुप या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या ग्रुप डान्समध्ये सर्व वृद्ध महिला आहेत. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. साडी नेसलेल्या या वृद्ध महिलांचा डान्स पाहून कोणीही भारावून जाईल. विशेष म्हणजे या महिलांनी हा डान्स चार भिंतीच्या आत नाही, तर निसर्गाच्या सानिध्यात केला आहे. या व्हिडीओत भरपूर हिरवीगार झाडेसुद्धा दिसत आहेत.
हेही वाचा : “लोणच्यामध्ये आवडते मला कैरीची फोड…” बायकोचा उखाणा ऐकून नवरा चक्क लाजला, व्हिडीओ एकदा पाहाच…
shantai_second_childhood या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून विशेष म्हणजे या महिला शांतीताई वृद्धाश्रमातील आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “म्हातारपण हे बालपणासारखे असते”, तर एका युजरने लिहिलेय, “किती सुंदर नाचल्या या सर्व आज्जी.” आणखी एका युजरने लिहिलेय, “या गाण्यावरील ही सर्वात सुंदर रिल आहे.”