Viral video: सोशल मीडियावर रोज किती तरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. काही व्हिडीओंना मोठ्या आवडीने शेअरही केले जाते. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. दरम्यान ठाण्यातील अशाच एका हौशी काकूंचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यांचा हा व्हिडीओ पाहून म्हणाल कलेला वयाचं बंधन नसतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की, आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात ज्यामुळे आपल्या एक वेगळाच उत्साह निर्माण होते. या काकूंचा व्हिडीओ बघून तुम्हालाही कळेल कला खरंच माणसाला जगायला शिकवते.संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत. आता तुम्ही म्हणाल या महिलांनी असं केलंय तरी काय? तर या व्हिडीओमध्ये तुम्ही दोन मध्यमवयीन महिलांना मस्तपैकी ड्रम सेट वाजवताना पाहू शकता. या महिला साडी परिधान करून बँड वाजवत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ ठाण्यामधील आहे. ठाण्यात हळदी कार्यक्रामात या महिलांनी ड्रम सेट वाजवल्याचं म्हटलं जातेय. यावकरुन नेटकरी “काकू खूपच खूश दिसत आहेत काकूंना लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता मिळाला वाटतं” अशा मजेशीर कमेंट करत खिल्ली उडवत आहेत.

असं म्हटलं जातं की माणूस हा शरिरानं वृद्ध झाला तरी चालेल पण मनानं वृद्ध होऊ नये. कारण जर तुमचं मन तरुण असेल तर तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याची मजा घेऊ शकता. आपण अनेकदा एकलं आहे वय तर फक्त आकडा आहे. हेच या काकूंनी सिद्ध करुन दाखवलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> याला म्हणतात खरे मुंबईकर! तरुण ओव्‍हरहेड वायरला चिकटला; प्रवाशांनी कसं वाचवलं पाहा; थरारक VIDEO व्हायरल

“कलेच्या आस्वादाला वयाचे बंधन नसते”

lokmanya_beats या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कलेच्या आस्वादाला वयाचे बंधन नसते”. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “”तिने” ठरवलं तर चांगलचं वाजवू पण शकते” तर आणखी एका युजरने “एकच नंबर काकूंना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले वाटतं” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old women play drum sets with wearing sarees in thane video goes viral on social media srk