ती आली तिने पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही… अशा शब्दांमध्येच टोक्यो ऑलिम्पिकमधील फिलिपिन्सच्या हिडिलीन डिआझच्या कामगिरीचं वर्णन करता येईल. डिआझने ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत थेट सुवर्णपदक पटकावले आहे. डिआझनं ही सुवर्ण कामगिरी करत आपल्या देशवासियांची मान अभिमानाने उंचावली आहे. वेटलिफ्टिंगपटू असणाऱ्या हिडिलीन डिआझ ५५ किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. फिलिपिन्सच्या कोणत्याही खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे डिआझवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच तिने केलेल्या कष्टांची झलक दाखवणारा एक फोटोही व्हायरल होतोय.

नक्की पाहा >> ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं; ५ कोटी रुपये, घर भेट म्हणून मिळालं

हिडिलीन डिआझ ही ३० वर्षींची आहे. आपल्या चौथ्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकत फिलिपिन्सचा सुवर्णपदकाचा ९७ वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणलाय. आधीच्या तीन ऑलम्पिक स्पर्धांमध्ये तिला सुवर्णपदकाने सतत हुलकावणी दिल्यानंतर अखेर चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये तिने बाजी मारली. विशेष म्हणजे सुवर्णपदक जिंकताना हिडिलीन डिआझने २२४ किलो वजन उचलत ऑलिम्पिकचा नवीन विक्रमही प्रस्थापित केलाय. “मी ३० वर्षांची आहे. त्यामुळेच वय वाढण्याबरोबर कामगिरीचा आलेख उतरता असेल असं मला वाटलं होतं. मात्र पदक जिंकल्याने मलाच स्वत:ला सुखद धक्का बसलाय,” असं मत हिडिलीन डिआझने व्यक्त केलं. हिडिलीन डिआझने सुवर्णपदक जिंकल्यानंतर फिलिपिन्सच्या अध्यक्षांचे प्रवक्ते हॅरी रोक्यू यांनी तिचं कौतुक केलं आहे. डिआझने सर्व देशवासियांना गौरव वाटावा अशी कामगिरी केल्याचं रोक्यू म्हणालेत. हिडिलीन डिआझने आता पॅरिसमध्ये होणाऱ्या पुढील ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे. या पदकामुळे डिआझला आत्मविश्वास वाढलाय. मात्र हे पदक जिंकण्यासाठी डिआझने किती मेहनत घेतलीय हे दिसून येत आहे. हा फोटो आहे डिआझच्या जखमा झालेल्या हातांचा.

गोल्डन हॅण्ड्स नावाने डिआझच्या हातांचा हा फोटो शेअर केला जातोय. या फोटोमध्ये डिआझच्या हातात सुवर्णपदक असून तिच्या हातावरील जखमा स्पष्टपणे दिसत आहेत. वेटलिफ्टिंगचा सराव करुन करुन तळहातावर जिथे जिथे उंचवटे असतात तिथे त्वचेवर जखमा झाल्याचं दिसत आहे.

आपल्याला फक्त पदक स्वीकारताना हसणारे खेळाडू आणि सेलिब्रेशन दिसतं मात्र त्यासाठी ते किती कष्ट घेतात हे आपल्याला कळत नाही. मात्र याच कष्टाची झलक दाखवणारा हा फोटो असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. ट्विटरवर तर शेकडोच्या संख्येने हा फोटो शेअर करण्यात आलाय. पाहुयात कोण काय म्हणालय…

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

घालण्यात आलेली प्रवास बंदी

याच गटामध्ये चीनच्या लिओ क्वियून (२२३ किलो) आणि कझाकस्तानच्या झुल्फिया चिनशानलो (२१३ किलो) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. सुवर्णपदक मिळाल्यानंतर डिआझला आश्रू अनावर झाले. मागील वर्षी पेरुमधील ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी जाण्यासाठी निघालेली डिआझ मलेशियात अडकल्यानंतर तिच्यावर करोनाच्या पार्श्वभूमीवर पाच महिन्यांची प्रवास बंदी घालण्यात आलेली. या बंदीमध्येही डिआझने आपला सराव थांबू न देता घरातच जीम निर्माण करुन सराव सुरु ठेवला.

कोट्यावधींचं बक्षीस

फिलिपिन्स हा देश १९२४ पासून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. मात्र आतापर्यंत या देशाला केवळ तीन रौप्य आणि सात कांस्य पदकांवर नाव कोरता आलं आहे. मात्र डिआझने पहिल्यांदाच फिलिपिन्सला सुवर्ण पदक मिळवून दिलंय. डिआझला पाच कोटी रुपये म्हणजेच ३३ मिलियन पीसॉस बक्षिस म्हणून मिळणार आहेत. फिलिपिन्स सरकारने प्रत्येक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला १० मिलियन पीसॉस देणार असल्याचं आधीच जाहीर केलेलं. डिआझला काही उद्योजकांकडूनही बक्षीस म्हणून मोठी रक्कम मिळणार असल्याने एकूण बक्षिसाची रक्कम ३३ मिलियन पीसॉसपर्यंत जाईल असं ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. तसेच डिआझला एक आलिशान घरही या कामगिरीसाठी भेट म्हणून देण्यात येणार आहे.

Story img Loader