एकीकडे टोमॅटोच्या वाढलेल्या भावामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे तर दुसरीकडे काही शेतकरी कोट्याधीश झाले आहे. आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यामध्ये ४८ वर्षीय शेतकरी मुरली याने आपल्या टोमॅटोची शेतीमधून केवळ एक महिन्यामध्ये ४ कोटींची कमाई केली आहे. मुरलीचा यशाचा मार्ग अपयश आणि अडचणींनी भरलेला होता. गेल्या वर्षी टोमॅटोच्या भावात घसरण झाल्याने त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे त्यांच्यावर दीड कोटी रुपयांचे कर्ज झाले. मात्र, वाढलेला वीजपुरवठा, पिकाची चांगली गुणवत्ता आणि अनुकूल भाव यामुळे त्याचे नशीब बदलले.

२२ एकर शेतात लावले टोमॅटो

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष

मुरलीची २२ एकर शेती आहे ज्यावर त्यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात टोमॅटोच्या दुर्मिळ जातीची पेरणी केली. उत्पादन जलद मिळण्यासाठी त्यांनी ते मल्चिंग( शेतात पॉलिथिनचे आच्छादन टाकले जाते)आणि सूक्ष्म सिंचन पद्धती यासारख्या प्रगत तंत्रांचा अवलंब केला. जूनच्या अखेरीस टोमॅटोचे उत्पन्न मिळाल्याने त्यांना त्यांच्या प्रयत्नांना यश आले.

हेही वाचा -ाचा तुमची मुलं एक मिनिटही मोबाइल सोडत नाहीत का? मग ५ सोप्या ट्रिक वापरून सोडवू शकता ही वईट सवय

कित्येक अडचणींचा केला सामना

यापूर्वी मुरलीला एपीएमसी यार्डने देऊ केलेल्या चांगल्या दरात टोमॅटो विकण्यासाठी कोलारपर्यंत १३० किमीहून अधिक अंतर पार करावे लागले होते. त्यांनी आपला माल कर्नाटकातील कोलार बाजारात विकला, जे त्यांच्या मूळ गावापासून जवळ आहे. बाजारात १५ किलोच्या टोमॅटोच्या क्रेटची किंमत १००० ते १५०० रुपयांच्या दरम्यान होती, जेव्हा त्यांनी गेल्या ४५ दिवसांत ४०,००० बॉक्स विकले. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे कर्ज फेडल्यानंतरही त्याने अवघ्या ४५ दिवसांत २ कोटी रुपयांची कमाई केली.

३ कोटींचा झाला नफा

टोमॅटोच्या भावात वाढ झाल्यामुळे आनंद व्यक्त करताना मुरली यांना सांगितले की “आतापर्यंत मिळालेल्या उत्पादनातून मला ४ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. एकंदरीत मला माझ्या २२ एकर जमिनीत एक कोटी रुपये गुंतवावे लागले आणि हे उत्पन्न मिळवण्यासाठी. कमिशन आणि वाहतूक शुल्काचा समावेश आहे. त्यामुळे नफा रुपये ३ कोटी झाला आहे.”

हेही वाचा – ‘हा कुत्रा नव्हे माणूस!’ कुत्र्यासारखे दिसण्यासाठी व्यक्तीने खर्च केले १२ लाख रुपये

भविष्यासाठी बनवली योजना

भविष्यात मुरली आपल्या कृषी व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हुशारीने गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि बागायती पद्धतींचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याचा त्यांचा मानस आहे. याव्यतिरिक्त, त्याच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी त्याच्या गावात सुमारे २० एकर जमीन मिळवण्याची त्याची योजना आहे.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनेही टोमॅटो विकून मिळवले कोटींचे उत्पन्न

यापूर्वी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने टोमॅटो विकून २.८ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती. ईश्वर गायकर म्हणाले, “मी एका दिवसात कमावलेली ही गोष्ट नाही. मी गेल्या ६-७ वर्षांपासून माझ्या १२ एकर शेतीत टोमॅटोची लागवड करत आहे. माझेही नुकसान झाले आहे.” अनेक वेळा पण मी माझी आशा सोडली नाही. २०२१ मध्ये माझे १८-२० लाख रुपयांचे नुकसान झाले पण मी थांबलो नाही.