हास्य हे प्रत्येक माणसाला निसर्गाकडून मिळालेले वरदान आहे. जे दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला मिळालेले नाही. यामुळे निरोगी राहण्यासाठी नेहमी हसत राहिले पाहिजे. हसल्याने केवळ शरीराचे आरोग्य सुधारण्यास मदत होत नाही तर तुम्हाला यातून जीवनाचा एक वेगळा आनंद घेतो येतो. तुम्ही आपल्या आवडत्या लोकांसह जितके जास्त हसता तितकेच तुमचे आणि त्यांचे नाते अधिक घट्ट होते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, हसायला शिकण्यासाठी तुम्हाला कधी पैसे द्यावे लागतील? यासाठी प्रशिक्षक नेमावे लागतील किंवा कोचिंग सेंटर जॉईंड. कदाचित अनेकांचे उत्तर नाही असे असेल. पण जपानमध्ये असे खरोखर घडतेय. जिथे लोक चक्क हसायला विसरले आहेत. ज्यामुळे ते पुन्हा हसणं शिकण्यासाठी मोठी रक्कम मोजत आहेत.
डेली मेलच्या वृत्तानुसार, कोरोना महामारीमुळे लोक ३ वर्षे तोंडावर मास्क घालून फिरत होते. पण गेल्या आठवड्यात सरकारने जेव्हा सर्व निर्बंध उठवले तेव्हा लोक हसणं विसरून गेल्याची धक्कादायक माहिकी समोर आली आहे. इतके दिवस मास्क घातल्यानंतर आता हसायचे कसे हेच लोक विसरले आहे. यामुळे लोक आता हसणं शिकण्यासाठी पैसे खर्च करत आहेत. अनेकांना वाटतेय की, मास्कमुळे ते यापुढे आपल्या चेहऱ्यावरील आनंदी भाव पुन्हा आणू शकत नाही, त्यामुळे ते आता तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.
जपान टाइम्सशी बोलताना स्माईल ट्रेनर मिहो कितानो म्हणाली की, मी अनेक लोकांकडून ऐकले आहे की, ते आपल्या चेहऱ्यावरील मास्क काझू शकतात. पण त्यांना चेहऱ्याचा खालचा भाग दाखवायचा नाही कारण त्यांनी भीती वाटतेय की, ते पुन्हा पहिल्यासारखं चेहऱ्यावर हसून ठेवत समोरच्या व्यक्तीसोबत बोलू शकतील. काहींना असे वाटते की, ते खूप जोरात हसले तर त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याभोवती अधिक सुरकुत्या दिसतात. ज्यामुळे त्यांच्या चेहरा एखाद्या वृद्धाप्रमाणे दिसतो. यामुळे चेहऱ्यावरची त्वचा लटकतेय की काय असा वाटते आणि म्हणून त्यांना आता जबरदस्तीने हसू वाटत नाही.
हेही वाचा : ऐकावे ते नवलच! घटस्फोटानंतर महिलेने चक्क फोटोग्राफरकडे मागितले पैसे; दोघांमधील चॅट इंटरनेटवर व्हायरल
हसण्यासाठी एक्सपर्ट शिकवतायत योगाभ्यास
यावर कितानेने पुढे म्हटले की, त्यांच्या स्माईल फेशियल मसल असोसिएशन कंपनीचा व्यवसाय यामुळे मोठ्या उंचीवर पोहचला आहे. लोकांना कोरोना महामारीपूर्वीचा त्यांचा चेहरा आणि त्यावरील हावभाव अनुभवायचे आहेत. यावर लोकांना विचारण्या आले की, त्यांना स्माईल सेंटरमध्ये नेमकं काय शिकवलं जात? ज्यावर त्यांनी उत्तर दिले की, स्माइल एक्सपर्ट त्यांना हसायला मदत करणारे योगाभ्यास शिकवतात. यावेळी गालाच्या स्नायू हालचाल होण्यासाठी त्यांना चावण्यासाठी काहीतरी दिले जाते. यामुळे हसण्यास मदत होते. यावर कितानेने पुढे म्हटले की, मी अनेक लोकांना भेटते ज्यांना चांगल हसायला जमत नाही, परंतु ते चांगले हसू शकतात. यासाठी त्यांच्या तोंडातील स्नायूंची रोज निश्चित हालचाल झाली पाहिजे. त्यांनी तोंडाचे व्यायाम करायला हवे