जग रहस्य, गूढतेने भरलेले आहे. वेळोवेळी धक्कादायक खुलासे होत असतात, काही तरी सापडतं असतं. कधीकधी अशी सत्ये समोर येतात, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण असते. जेरुसलेम, इस्त्रायल येथून असाच एक प्रकार उघडकीस आला आहे, जिथे २७०० वर्षांपेक्षा जुने शौचालय सापडले आहे. हे स्वच्छतागृह पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित होतात, कारण हे एक लक्झरी शौचालय आहे असं म्हटले जात आहे. पूर्वीच्या काळातील लोकांनी अशी शौचालये वापरली होती यावर संशोधकांना खात्री नाही. चला, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळालेल्या माहितीनुसार, पुरातत्त्वशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की चुना आणि दगडाने बनवलेले हे भव्यदिव्य शौचालय आयताकृती कक्ष सापडले आहे. अहवालात असेही म्हटले आहे की हे शौचालय अशा प्रकारे बांधले गेले आहे की ते बसण्यास पुरेसे आरामदायक आहे आणि त्याच्या खाली जमिनीत खोल सेप्टिक टाकी खोदण्यात आली आहे. उत्खनन कार्याचे संचालक याकोव बिलिंग यांच्या मते, पूर्वीच्या काळात खाजगी शौचालये फार दुर्मिळ होती आणि आतापर्यंत अशी काही स्वच्छतागृहे सापडली आहेत. ते म्हणतात की फक्त श्रीमंत लोकच शौचालये बांधू शकले.

स्क्रॅपमधून विकत घेतलं जुनं ATM मशीन; उघडल्यानंतर चमकलं नशीब, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

धक्कादायक सत्य

उत्खननादरम्यान, शौचालयाच्या सभोवतालच्या बाग आणि जलचर वनस्पतींचे पुरावे देखील मिळाले आहेत, जे दर्शविते की तेथे राहणारे लोक खूप श्रीमंत होते. आता ही बाब चर्चेचा विषय बनली आहे आणि याबद्दल अधिक तपास चालू आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omg luxury toilet over 2700 years old found here know its specialty ttg