पुरुष असो वा महिला…लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी सध्या नवरा-नवरीसुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राइझ देण्याचा प्रयत्न करतात. अशाच एक नवरीने आपल्या नवरदेवाला असं सरप्राइझ दिलं जे पाहून तो थक्कच झाला. नवरीने तिच्या लग्नात असा डान्स केला की भरमांडवात नवरदेवाने तिच्यासोबत घटस्फोट घेतला. असं नक्की काय झालं पाहा या व्हायरल व्हिडीओमध्ये….
इराकमधील बगदादमध्ये ही विचित्र घटना घडलीय. सर्वात जलद घटस्फोटाचे हे प्रकरण समोर आलं आहे. या घटनेत नवरीने तिच्या लग्नात असा काही डान्स केला की सर्वांचं लक्ष तिच्याकडे जातं. नवरदेव तिच्याकडे पाहतो तर तोसुद्धा शॉक होतो. नवरीने लग्नात सीरियन गाण्यावर उत्तेजक डान्स केला. तिचा डान्स पाहून नवरदेव डोळे मोठे करून, आ वासून तिच्याकडे पाहत राहतो. नवरदेवासह सर्व पाहुणे, नातेवाईकही नवरीला पाहून थक्क होतात. नवरीचा हा डान्स पाहून नवरदेवाची सटकली आणि त्याने भरमांडवातच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आता ही नवरी नेमकं असं कोणता डान्स करते? असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल.
आणखी वाचा : टांझानियन तरुणाचा आता ‘सामी सामी’ गाण्यावर डान्स VIDEO VIRAL, ५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज
या नवरीने सीरियाई गाणं ‘मेसायतारा’ ‘मेसायतारा’ ज्याचा अर्थ ‘मी डॉमिनेट आहे’ आणि ‘मी तुला कंट्रोल करीन’ असा होतो. या गाण्याच्या लिरिक्सनी नवरदेवाच्या भावना दुखावल्या आणि त्याने लग्नाच्या मंडपातच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांनी ‘मेसायतारा’ गाण्यातील शब्द हे चिथावणीखोर असल्याचं सांगितलं, या गाण्याचा कोणताही आनंदी नव्हता. यावेळी नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांनी नवरीसोबत वाद घातला आणि तिला घटस्फोट दिला. गाण्याच्या सुरुवातीच्या , ‘मी प्रभावशाली आहे; माझ्या कडक सूचनांनुसार तुमचा कारभार चालेल. तू माझी साखरेची गाठ आहेस; जोपर्यंत तू माझ्याबरोबर आहेस तोपर्यंत तू माझी आज्ञा पाळशील; मी गर्विष्ठ आहे, मी गर्विष्ठ आहे.’ अशा अर्थाचे लिरीक्स या गाण्यात आले होते. त्यामूळे नवरदेवाचा स्वाभिमान दुखावला आणि त्याने काडीमोड घेतला.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : खादाड नवरीबाई! काही क्षणात बोहल्यावर चढणार, पण चायनीज स्नॅक्स खाण्याचा मोह काही आवरला नाही
केवळ गाण्यामुळे नवविवाहित जोडप्याला घटस्फोट देण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी देखील, एका जॉर्डनच्या माणसाने त्यांच्या लग्नाच्या वेळी नवरीने हे गाणे वाजवले तेव्हा तिच्या नवरदेवाने सुद्धा संबंध तोडले. ‘आय लव्ह यू गाढव’ या गाण्यामुळे लेबनॉनमध्ये काही वर्षांपूर्वी अशाच एका घटनेची पुनरावृत्ती झाली होती. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, गाण्यावर डान्स केल्यानंतर नवरदेवाने पत्नीला घटस्फोट दिला.