करोनामुळे देशभरातील अनेक ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी देण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांपासून अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम करत आहेत. मात्र नंतर हळूहळू करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर काही ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना परत बोलावण्यात येत होतं. परंतू काही कर्मचारी कामासाठी घर सोडताना नाराज होऊ लागले होते. घरून काम आणि महिन्याच्या शेवटी पगार यामुळे अनेकांचे स्वप्न साकार झाले. पण करोना व्हायरसचा नवीन प्रकार ओमायक्रॉनने पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे आता ऑफीसमध्ये जाऊन काम करावं लागणार याचं दुःख करत बसलेले कर्मचारी पुन्हा आनंदी झाले आहेत. या कर्मचाऱ्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ‘मोहब्बतें’ चित्रपटातला एक सीन शोधून काढलाय. हा सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा सीन पाहून सारेच जण खळखळून हसत आहेत. तुम्ही सुद्धा हा व्हिडीओ एकदा पाहाच.

२०२१ च्या शेवटच्या महिन्यांत कार्यालयीन टप्प्यातील काम सुरू होऊ लागले. परंतु ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे कंपन्यांच्या एचआर विभागाने लोकांना पुन्हा घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. लोक ऑफिसमध्ये परतण्याची तयारी करत होते. तितक्यात करोनाच्या नवीन प्रकाराने ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ अशी एन्ट्री केली आणि कंपन्यांना पुन्हा वर्क फ्रॉम होमची घोषणा करावी लागली. यावर एक मीम व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा मीम व्हिडीओ फारच मजेदार असून पाहण्यासारखा आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा जर वर्क फ्रॉम होम करत असाल तर नक्कीच आनंद होईल. हा व्हिडीओ एकदा पाहाच.

abhishek gaonkar
Video : सोनाली गुरवबद्दल अभिषेक गावकरने त्याच्या घरी पहिल्यांदा कसं सांगितलं? लग्नातील व्हिडीओ शेअर करीत सांगितला किस्सा…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
viral video
Video : हे काय चाललंय पुण्यात! वाहतूक पोलिसाच्या अंगावर धावून आली व्यक्ती, नेमकं काय प्रकरण काय?
Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
celebrity masterchef nikki tamboli emotional breakdown after see brother photo
Video: ‘तो’ फोटो पाहताच निक्की तांबोळीच्या अश्रूंचा बांध फुटला, फराह खान समजावत म्हणाली, “तुझ्या मनात…”
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
a child girl amazing lavani dance
Video : चिमुकलीने सादर केली अप्रतिम लावणी, चेहऱ्यावरील हावभाव पाहून क्षणभरासाठीही नजर हटणार नाही; व्हिडीओ होतोय व्हायरल

आणखी वाचा : VIRAL : मुलांना गाडीत ठेवून पिकनिक एन्जॉय करत होते, अन् डोळ्या देखत स्कॉर्पिओ जळून खाक झाली

जेव्हा ओमायक्रॉनच्या तालावर नाचू लागते कंपनी
ही क्लिप अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान स्टारर ‘मोहब्बतें’ चित्रपटातील एका सीनमधली आहे. या सीनमधली क्रिएटीव्हीटी विकास पॉल या युजरने साकारली आहे. हा व्हिडीओ त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलाय. तो एक स्टँड-अप कॉमेडियन आहे. ट्विटरसोबतच इन्स्टाग्रामवरही त्याने हा मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. विकासने या व्हिडीओमध्ये दिसणार्‍या पात्रांना अलीकडच्या प्रसंगाशी जोडलं आहे. यात असं दर्शविलं गेलं आहे की, HR वर्क फ्रॉम होमचा आनंद घेत असलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफीसमध्ये जाण्यासाठी ऑर्डर देणार होता, पण जेव्हा Omicron ने जोरदार एन्ट्री केली आणि पुन्हा वर्क फ्रॉम होमचा आदेश दिला.

आणखी वाचा : अरे बापरे! सिंहाला कडेवर घेत फिरत होती महिला; VIRAL VIDEO पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!

इथे पाहा हा व्हायरल सीन :

आणखी वाचा : VIRAL : सासऱ्याने कुत्र्यावरच केला बलात्कार, व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर सुनेसोबतही ‘हे’ कृत्य केलं

मात्र, वर्क फ्रॉम होमचा फायदा सर्वांनाच होताना दिसत नाही. ओमायक्रॉनमुळे लोकांचं वैयक्तिक नुकसान देखील अनेक नुकसानांशी संबंधित आहे. तम्मु एन चेल्लम नावाच्या युजरने याचा उल्लेख केला आहे. त्याच्या ट्विटवरून असं दिसून आलं आहे की, तो आंध्र प्रदेशमध्ये शिक्षकांच्या नोकरीच्या नोटिफीकेशनच्या प्रतिक्षेत होता, ज्याला ओमाक्रॉनमुळे विलंब होत आहे. स्लीपिंग नावाच्या आयडीवरून काही मेकॅनिकल इंजिनिअर्सची व्यथा दाखवणारा एक मीम शेअर केला आहे.

हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागला आहे. ही क्रिएटीव्हीटी लोकांना इतका आवडली आहे की, यावर प्रतिक्रियांचा अक्षरशः महापूर आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह मात्र आवरता येत नाही. विकासाचा हा व्हिडिओ anupr3 नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे, ज्याला सुमारे सहा हजार युजर्सनी रिट्विट केलं आहे आणि १२ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

Story img Loader