करोनामुळे देशभरातील अनेक ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी देण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांपासून अनेक कर्मचारी वर्क फ्रॉम करत आहेत. मात्र नंतर हळूहळू करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर काही ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना परत बोलावण्यात येत होतं. परंतू काही कर्मचारी कामासाठी घर सोडताना नाराज होऊ लागले होते. घरून काम आणि महिन्याच्या शेवटी पगार यामुळे अनेकांचे स्वप्न साकार झाले. पण करोना व्हायरसचा नवीन प्रकार ओमायक्रॉनने पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे आता ऑफीसमध्ये जाऊन काम करावं लागणार याचं दुःख करत बसलेले कर्मचारी पुन्हा आनंदी झाले आहेत. या कर्मचाऱ्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ‘मोहब्बतें’ चित्रपटातला एक सीन शोधून काढलाय. हा सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा सीन पाहून सारेच जण खळखळून हसत आहेत. तुम्ही सुद्धा हा व्हिडीओ एकदा पाहाच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा