Omraje Nimbalkar Won video viral: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राजेनिंबाळकर आणि पाटील कुटुंबातील वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे या निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा वेळोवेळी पहावयास मिळत होता. दरम्यान आजवर झालेल्या एकूण १७ लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा ओमराजे यांनी तब्बल तीन लाख २९ हजार ८४६ मतांनी पराभव केला आहे. ओम राजेनिंबाळकर यांना सात लाख ४८ हजार ७५२ तर अर्चना पाटील यांना चार लाख १८ हजार ९०६ इतकी मते मिळाली आहेत.

या ऐतिहासिक विजयानंतर ओमराजे निंबाळकर यांचा त्यांच्या आईसाहेबांसोबतचा एक भावनीक व्हिडीओ समोर आला आहे. लेकाच्या एतिहासिक विजयानंतर आईला झालेला आनंद आणि लेाकाच्या डोळ्यातलं पाणी सर्वकाही सांगून जातंय. माय-लेकाच्या या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?
ajay devgan and aamir khan
‘इश्क’च्या शूटिंगवेळी चिपांझीने केलेला हल्ला; ‘वाचवा, वाचवा’ म्हणत आमिर खान ओरडला अन् अजय देवगणने धावत्या कारमधून…
ramdas athawale poem for pm modi
VIDEO : “पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणूनच ते…”; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ओमराजे निंबाळकर आपल्या आईचा आशिर्वाद घेण्यासाठी आले असता त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. यावेळी त्यांच्या आईलाही अश्रू अनावर झाले असून दोघंही माय-लेक मीठी मारुन रडताना दिसत आहेत. यानंतर आईने ओमराजे यांचं औक्षण केलं तसेच त्यांच्या पत्नीनंही औक्षण केलं. तर त्यांच्या मुलीनंही त्यांना मीठी मारत स्वागत केल. एकंदरीत हा संपूर्ण क्षण निंबाळकर कुटुंबियांसाठी अतिशय भावनिक असा होता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री होवोत” नितीश कुमारांचा ‘तो’ VIDEO व्हायरल; पाहून पोट धरुन हसाल

मतदारांनी दिलेला कौल आपल्या कामाची पावती

बाळासाहेब ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांच्यामुळे मागील निवडणुकीतही आपण विजयी झालो होतो. सातत्यपूर्ण काम आणि सर्वसाधारण मतदारांसोबत असलेला संपर्क याच्या बळावरच मतदान करण्याचे आवाहन आपण केले होते. काम केले असेल तर मागील वेळेपेक्षा किमान एक मत यावेळी जास्त द्या, असे आवाहन केले आणि मतदारांनी दिलेला कौल आपल्या कामाची पावती असल्याची आणि भविष्यातील जबाबदारी अधिक गांभीर्याने पार पाडण्यासाठी दिलेला आशीर्वाद असल्याची प्रतिक्रिया विजयी उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली.