सहलीसाठी वाहनाने प्रवास करताना अनेकदा रस्त्यावर साप दिसतात. अशा परिस्थितीत जेव्हा सापाचा सामना करावा लागतो तेव्हा प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी उपाय शोधून काढतो. तसेच शूज, खुर्च्या, हेल्मेटमध्ये साप लपलेले असतात, असे अनेक व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असतील. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सहलीसाठी गेलेल्या कुटुंबाच्या कारमध्ये एअर कंडिशनर एसी व्हेंट्सजवळ साप आढळून आला आहे .
ऑस्ट्रेलिया येथे रोड ट्रिपसाठी एक कुटुंब निघाले होते. पण, अचानक त्यांच्या सहलीमध्ये मोठे संकट आले. कारण- हे कुटुंब ज्या कारमधून प्रवास करीत होते, त्या कारमध्ये साप आढळला. हे पाहताच कुटुंबातील बाबा ड्रायव्हिंग करताना गाडीच्या बाहेर उडी घेतात आणि कुटुंबातील सदस्यांना कारच्या एअर कंडिशनर एसी व्हेंट्समध्ये साप आहे, असे कळवतात, असे कुटुंबातील मुलगी लिली सांगताना दिसली.
हेही वाचा…ऐंशी वर्षांच्या आजोबांना मिळाले जीवदान! मृत घोषित केल्यानंतर कसा घडला ‘हा’ चमत्कार जाणून घ्या…
व्हिडीओ नक्की बघा :
व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, कार चालू असताना अचानक कारच्या एअर कंडिशनर एसी व्हेंट्समधून पिवळ्या रंगाचा साप बाहेर येतो. प्रवासादरम्यान वस्तीसाठी थांबलेल्या ठिकाणी त्यांनी दरवाजा उघडाच ठेवला आणि म्हणूनच त्यांच्या कारमध्ये साप शिरला, असे कुटुंबाचे म्हणणे आहे. हा साप कदाचित एक मीटर असावा. सर्व गोष्टी लक्षात घेता, संपूर्ण कुटुंब खबरदारी घेत गाडीतून बाहेर आले.
गाडीच्या बाहेर उभे राहून आणि काही वेळ त्यांनी साप निघून जाण्याची वाट पाहिली. पण, काहीच पर्याय नसल्यामुळे त्यांनी धाडस दाखवीत, २० मिनिटांचा प्रवास करीत सुखरूप घरी पोहचले. मग रात्रभर गाडीच्या खिडक्या उघड्या ठेवल्या आणि रात्रभर गाडी एकाच जागी ठेवली. त्यानंतर सकाळपर्यंत साप गाडीच्या बाहेर निघून गेला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @7newsAustralia यांच्या यूट्युब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; जो पाहिल्यावर तुमच्याही अंगावर नक्कीच शहारा येईल.