सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओ एका विमानतळावरील असून एक महिला कर्मचारी तोंडात नोटा कोंबताना आणि गिळताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून लोकांना प्रश्न पडला आहे की, तिने असे का केले असावे? दरम्यान याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार प्रवाशांकडून चोरलेले हे पैसे होते आणि चोरी पकडली जाण्याच्या भितीने विमानतळावरील महिला कर्मचारीने चक्क ते पैसे गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
फिलीपिन्समधील मनिला येथील निनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा प्रकार घडला. येथे तैनात ‘सिक्योरिटी स्क्रीनिंग ऑफिसर’ (SSO) ३०० डॉलर गिळताना कॅमेऱ्यात कैद झाली असून तिने ते पैसे एका प्रवाशाकडून चोरले होते असे समजते आहे.
सीएनन फिलीपिन्सने दिलेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर रोजी टर्मिनल १ दरम्यान हा प्रकार घडला. देशाच्या वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेल्या ऑफिस फॉर ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी (OTS) ने आपल्या फेसबुक पेजवर या घटनेबद्दल एक निवेदन पोस्ट केले आहे. व्हायरल व्हिडीओ @jacobincambodia या एक्स (ट्विटर) अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहून लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.
हेही वाचा – देवाच्या दारात भेदभाव? लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत सेलिब्रिटींना VIP दर्शन अन् सामान्यांना धक्काबुक्की; Video Viral
यामध्ये सहभागी असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्याची ओळख पटवण्यात आली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सुरक्षा अधिकारी तिच्या तोंडात रोख रक्कम कोंबताना आणि नोट घशात ढकल्यासाठी ती तोंडात बोट टाकून ढकलताना दिसत आहे आणि पाणी पिऊन तिने पैसे गिळले असे दिसत आहे. तसेच ती रुमालाने झाकताना दिसत आहे.
“निनॉय अक्विनो आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्मिनल १ मधील सुरक्षा स्क्रीनिंग अधिकाऱ्याचा समावेश असलेल्या चोरीच्या आरोपांबद्दल माहिती मिळाली. आरोपानुसार, ३०० यूएस डॉलर्सची रोख रक्कम गहाळ झाले होती. ऑफिस फॉर ट्रान्सपोर्टेशन सिक्युरिटी (OTS) ने माहितीची सत्यता तपासण्यासाठी कारवाई केली आणि सत्य शोधण्यासाठी तपास सुरू आहे, असे ओटीएसने एका निवेदनात सांगितले आहे.
हेही वाचा -ॲपल वॉचच्या नादात शौचलयात अडकली महिला! नंतर करू लागली आरडा-ओरडा; संपूर्ण प्रकरण वाचून तुम्हीही डोकं धराल
OTS या प्रकरणावर मनिला आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण आणि फिलीपीन नॅशनल पोलिस एव्हिएशन सिक्युरिटी बरोबर ( Manila International Airport Authority and the Philippine National Police Aviation Security) काम करत आहे. आरोप खरे ठरल्यास प्रशासकीय कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.