Girl died while dancing: मृत्यू कधी कुठे कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. हसताना, बोलताना, चालताना, नाचतानाही धडधाकट दिसणाऱ्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो. असाच एक मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एका तरुणीचा नाचता नाचता मृत्यू झाला आहे. लग्नात नाचताना ही तरुण कोसळली आणि तिचा जागच्या जागी जीव गेला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. लग्न म्हटलं की धम्माल, मजा-मस्ती, नाचगाणं आलंच. अशाच एका लग्नाच्या पार्टीचा हा व्हिडीओ आहे. जिथं एक तरुणी आणखी दोन तरुणींसोबत डान्स करत होती. पण काही क्षणातच हे आनंदाचं वातावरण शोकाकुल वातावरणात बदललं.

कारण डान्सचा आनंद लुटणाऱ्या या तरुणीचा नाचता नाचता जागच्या जागीत मृत्यू झाला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक तरुणी तरुणींसोबत डान्स करत आहे. ही तरुणी गाण्याचा पुरेपूर आनंद घेत आहे. अगदी मन लावून या गाण्यावर डान्स करते आहे. तरणीच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे आहेत. तिचा डान्स पाहून तिथं असलेले लोकही त्यांना प्रोत्साहित करत आहेत. टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गाणं वाजत आहे आणि याच गाण्यावर सगळे नाचत आहेत. यावेळी काही तरुणीही नाचत आहेत. यातलीच एक तरुणी नाचता नाचता अचानक शेजारी असलेल्या मुलाचा हात पकडते आणि तेव्हाच तिचा तोल जातो अन् ती खाली कोसळते. यावेळी सर्वजण मुलीभोवती जमा झालेले आहेत. तरूणी बेशुद्ध झाली होती. यानंतर घटनास्थळी मोठा आरडाओरडा झाला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पालींना घरातून पळवून लावण्यासाठी केला भन्नाट जुगाड; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने म्हटलं आहे ही मोठ्या आवाजातील गाण्यांमुळे कोणत्याही वयाच्या व्यक्तींच्या हृदयावर खूप परिणाम होतो. या तरुणीच्या मृत्यूचं कारण मोठ्या आवाजात लावण्यात आलेलं गाणं असू शकतं. कदाचित या व्यक्तीला हार्ट अटॅक आला असावा. अशाही कमेंट येत आहेत.

Story img Loader