सोशल मीडियावर पोलिसांशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांचे विविध रूप आपल्याला पाहायला मिळत असतात. परंतू पोलिसांची ड्युटी कशी असते, यावर वेगळं बोलायला नकोच. दिवाळी असो, गणपती असो एखाद्या राजकीय नेत्याचा दौरा किंवा मग अगदी घरातला कोणताही सण. पोलिस नेहमीच ऑनड्युटी असतात. मात्र या सगळ्यात पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू, पोलिसाचा महिलेवर अत्याचार, पोलिसांमधील लाचखोरी वाढली… अशा बातम्या नित्याच्या झाल्या आहेत. ‘पोलिससुद्धा एक माणूस असतो’ असे सांगून पोलिसांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले जाते. पण अशा घटनांच्या वेळी पोलिसांतील माणूस कोठे जातो? रोजच्या यंत्रवत आणि उपेक्षेच्या जीवनात तो हरवलाय का?

याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यामध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ऑनड्युटी पोलीस कॉन्स्टेबलला जेवताना उठवलं आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेत संताप व्यक्त करत आहेत. तुम्हीही पाहा व्हिडीओ. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव उत्तर प्रदेशातील आझमगड येथे गेले होते. तिथे त्यांनी एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत जे पोलिस कर्मचारी होते त्या दरम्यान हा प्रकार झाला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या कार्यक्रमादरम्यान एका हवलदाराने जेवण करण्यास सुरुवात केली मात्र यावेळ एसपींनी त्यांना जेवताना पाहिले आणि फटकारले आणि एसपी त्यांना म्हणाले की,’इथे ड्युटीवर आलात जेवायला?कार्यक्रम झाला की जेवा,चला आता तिकडे’.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: नवरदेवानं नाकारलं भटजींनी घ्यायला लावलेलं वचन! नवरी चिडली अन् पुढे झालं असं की…

खाकी वर्दी चढविली की पोलिसाने नाती-गोती आणि वैयक्तिक मते विसरून निःपक्षपाती काम केले पाहिजे, अशी रास्त आपेक्षा पोलिसांकडून आहे. वर्दी एका नव्या माणसाला जन्म देते. तो सर्वांचा रक्षणकर्ता असतो. त्याच्यासमोर येणाऱ्या अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देणे आणि अन्याय करणाऱ्याला तुरुंगात डांबणे, असे काम पोलिसाच्या हातून व्हावे, अशी साधारणपणे या व्यवस्थेची रचना आहे. मात्र, वर्दी चढविली, म्हणजे त्याच्यातील माणूस आणि माणुसकी संपली असे नाही.

Story img Loader