नुकतंच भारतातील अनेक राज्यांमध्ये ‘करवा चौथ’ हा सण साजरा करण्यात आला. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. आणि चंद्रोदयानंतर हा व्रत सोडतात. हा व्रत फारच कडक आणि कठीण असतो. यावेळी महिला दिवसभर निर्जळी उपवास करतात आणि रात्री चाळणीतून चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडतात. मात्र या शुभदिनी एक हैराण करणारी घटना बिहार राज्यातून समोर आली आहे. येथील एका पुरुषाने करावा चौथच्या दिवशीच आपल्या पत्नीचे लग्न तिच्या प्रियकरासह लावून दिले. हे प्रकरण नेमकं काय आहे, ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बिहारच्या भागलपूरमध्ये करवा चौथच्या दिवशीच अशी एक घटना घडली आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गुरुवारी १४ ऑक्टोबरला एकीकडे विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करत होत्या, तर दुसरीकडे मात्र एका पतीने आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकरासह लग्न लावून दिले आहे. या प्रकरणामुळे चर्चांना उधाण आले आहे.

बांका येथे राहणाऱ्या महिलेचे लग्न २०१२ साली झाले. लग्नानंतर तिला ४ मुलेही आहेत. मात्र यानंतर तिची एका व्यक्तीशी भेट झाली आणि ती तिच्या प्रेमात पडली. हे गाव त्या व्यक्तीचे आजोळ होते. तो नेहमी येथे यायचा. या दरम्यान दोंघांची ओळख झाली, त्यांचे बोलणे वाढले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. काही दिवसांनी महिलेच्या पतीला याबद्दल कळले. मात्र, यावेळी पतीच्या विचारांनी सर्वच थक्क झाले. पती म्हणाला की त्याची पत्नी जिथे सुखी राहील त्यातच त्याचे सुख असेल.

काळजावर दगड ठेवून अवघ्या तीन वर्षाच्या मुकबधीर मुलाला ट्रेनमध्येच सोडून गेली आई; चिठ्ठीमध्ये लिहिलं, “माझ्यासाठी…”

ग्रामन्यायालयात झालेल्या या ऐतिहासिक निर्णयात सरपंच आणि मुख्याधिकाऱ्यांशिवाय डझनभर ग्रामीण पंचांची उपस्थिती होती. करवा चौथला गुरुवारी सायंकाळी ग्राम न्यायालयात कागदोपत्री प्रक्रिया पार पडल्यानंतर पतीने आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. इतकेच नाही तर आपल्या चार मुलांना सांभाळण्याची तयारीही या पतीने दाखवली आहे. या चारही मुलांचे वय दोन ते आठ वर्ष्यांच्या दरम्यान आहे.

दरम्यान, या महिलेने पंचांच्या समोर हे मान्य केले की तिचे तिच्या प्रियकरावर प्रेम असून तिला आपल्या पतीकडून कोणतीही मालमत्ता नको आहे. त्याचबरोबर ती पतीला मुलांसाठी त्रासही देणार नाही आहे. गाव न्यायालयातील कागदोपत्री प्रक्रिया आता पूर्ण झाली असून करवा चौथच्या दिवशी पतीने त्याच्या पत्नीची इच्छा पूर्ण केली आहे. सध्या हे प्रकरण चर्चेत आहे.