Viral Video: या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पहिल्या इयत्तेत असलेली चिमुकली शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गात रडताना दिसत आहे. समाजमाध्यमांवर हल्ली काय काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. विविध गाणी, डान्स, रील्सव्यतिरिक्त अनेकदा इतर विषयांवरील व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. त्यात कधी प्राण्यांचे व्हिडीओ, अपघाताचे व्हिडीओ, तर कधी लहान मुलांचे व्हिडीओदेखील पाहायला मिळतात. अशा व्हिडीओंमध्ये बऱ्याचदा लहान मुलांचे त्यांच्या शाळेतील अनेक व्हिडीओदेखील व्हायरल झालेले आपण पाहतो. त्यात मुलं कधी कविता म्हणताना दिसतात, तर कधी आपल्या शिक्षकांसह मजेशीर गप्पा मारताना दिसतात; पण काही विद्यार्थी असेदेखील असतात, जे शाळेत रडताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हाला हसू येईल.
शाळा म्हटलं की, आपल्या सर्वांच्याच चेहऱ्यावर एक गोड हसू येतं, शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करून राहतात. या जगात अशी एकही व्यक्ती नसेल की, ज्याच्या शाळेशी जोडलेल्या काही आठवणी नसतील. या आठवणींसह आणखी एक आठवण कायम लक्षात राहणारी असते, ती म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील शाळेचा पहिला दिवस. शाळेच्या पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थी शाळेत जाताना रडताना तुम्ही पाहिलं असेल. या व्हायरल व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पहिल्या इयत्तेत असलेली चिमुकली शाळेच्या पहिल्या दिवशी वर्गात रडताना दिसत आहे. यावेळी ती रडत रडत आपल्या शिक्षकांना “आईला बोलवा”, असं सांगते. यावेळी तिचे शिक्षक “तुझ्या आईनंच तुला इथे सोडलं आहे. तू अभ्यास कर; मग सोडतो तुला”, असं सांगतात. यावेळी ती विद्यार्थिनी पुन्हा रडत रडत, “मला आईकडे जायचंय”, असं सांगते. यावेळी तिचं बोलणं ऐकून वर्गातील इतर विद्यार्थी हसताना दिसत आहेत. हे गमतीशीर व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण येत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sagar350savi या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर कॅप्शनमध्ये, ‘मला घरी जायचंय’, असं लिहिण्यात आलं आहे. तर या व्हिडीओला आतापर्यंत चार दशलक्षांहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत; तर ९० हजारांहून अधिक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लीक करा:
या व्हिडीओवर कमेंट्स करीत एका युजरनं लिहिलंय, “समजून घ्या. आपणही असेच होतो कधीतरी.” तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “मला माझ्या शाळेचा पहिला दिवस आठवला.” इतर युजर्स हा व्हिडीओ पाहून खूप हसताना दिसत आहेत.
दरम्यान, यापूर्वीदेखील सोशल मीडियावर लहान मुलांचे त्यांच्या शाळेतील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यात काही विद्यार्थी आपल्या शिक्षकांसोबत डान्स करताना दिसले होते. आणखी एका व्हिडीओमध्ये विद्यार्थी शिक्षकाशी टिफिन शेअर करताना दिसले होते.