नव्या वर्षाच्या सुरूवातीला युथबिल्ड यूएस इंक या संस्थेचे जॉन वॉलवर्ड सीईओ होणार आहेत. सध्या सोशल मीडियावर या बातमीची जोरदार चर्चा आहे. कारण हत्येच्या आरोपावरून त्यांनी १६ वर्षांचा तुरुंगवास भोगला आहे. आपल्या प्रेयसीचा बलात्कार करणाच्या संशयावरून त्यांनी एका फोटोग्राफर्सची हत्या केली होती, पण आता लवकरच ते जगभरातील तरूणांचे भविष्य सुधारण्याकरता काम करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : मुलगा गुगलमध्ये इंजिनिअर, तर वडील गावात करतात मोलमजुरी

शालेय शिक्षण सोडून वाईट मार्गाला लागलेल्या मुलांचे भविष्य पुन्हा घडवण्यासाठी युथबिल्ड ही संस्था काम करते. जगभरातील मुलांना ही संस्था मदत करते. या संस्थेचे सीईओ पद ३ जानेवारीला जॉन वॉलवर्ड स्वीकारत आहेत. ज्या मुलांसाठी ही संस्था काम करते त्यातल्या ३ पैकी १ मुलांने काहीना काही अपराध केला आहे. या सर्वांना गुन्हेगारी प्रवृत्तीतून बाहेर काढून नवी दिशा देण्याचे मोठी जबाबदारी आत जॉन यांच्यावर आहे. १९९१ मध्ये वीस वर्षाचा असताना जॉनने एका फोटोग्राफरची डोक्यात गोळी घालून हत्या केली होती. त्यांच्या प्रेयसीवर त्याने बलात्कार केला होता असे जॉनने म्हणणे होते. याचा बदला घेण्यासाठी त्यांनी गोळी घालून त्याला ठार केले. या हत्येसाठी जॉन तुरूंगात गेले होते. एका घटनेने शाळेतील या हुशार विद्यार्थाचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले.

VIDEO : लग्नात पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा वधुच्या पित्याने गरिबांसाठी बांधली मोफत घरे

पण तुरुंगात गेल्यानंतर खचून न जाता त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. तसेच तुरुंगातल्या इतर कैद्यांना देखील त्याने लिहायला, वाचायला शिकवले. एचआयव्ही विषयी जनजागृती देखील केली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांना अनेक सेवाभावी संस्थांसाठी काम करण्यात स्वत:ला झोकून दिले. तीन जानेवारीला ते युथबिल्ड यूएस इंक या संस्थेचे सीईओ होणार आहेत. शिक्षण सोडलेल्या आणि गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या तरुणांना या वाईट जगातून बाहेर काढण्याचे काम त्यांना करायचे आहे.