Viral Video : महाराष्ट्राला आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभला आहे. येथील गडकिल्ले महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. महाराजांना मानवंदना देण्यासाठी हजारो शिवप्रेमी त्यांच्या गडकिल्ल्यांना भेट देतात आणि तेथील व्हिडीओ फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करतात.
सोशल मीडियावर तुम्ही आजवर गडकिल्ल्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल. कोणी गडकिल्ल्यावर शिवगर्जना म्हणताना दिसतं तर कोणी भजन गीत गाताना दिसतं. कोणी नऊवारी साडी नेसून गड चढताना दिसतं तर कोणी गडकिल्ल्यांची स्वच्छता करताना दिसतं पण सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्या व्हिडीओमध्ये १८ महिन्याचा चिमुकला तिकोना किल्ला चढताना दिसत आहे. हा चिमुकल्याला पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
दीड वर्षाच्या चिमुकल्याने सैर केला तिकोना किल्ला!
या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्हाला एक चिमुकला दिसेल. हा चिमुकला तुम्हाला हळू हळू तिकोना चढताना दिसत आहे. गड चढल्यानंतर तो गडावरील अनेक ठिकाणांना भेट देतो आणि कुतूहलाने सर्व गोष्टी बघतो. गडकिल्ल्यावर खेळतो, फिरतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल आणि या चिमुकल्याचे कौतुक कराल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
xtremetrekkers या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पालक-मुलांच्या सहलीचे आयोजन..
माझा मुलगा कार्तिक वयाच्या अवघ्या १८ महिन्यांत तिकोना किल्ला चढला…त्याची चिकाटी, समर्पण, कधीही हार न मानण्याची स्पिरिट, आत्मविश्वास, शोधण्याचा उत्साह आणि भरपूर ऊर्जा यामुळे मला वडील म्हणून अभिमान वाटतो”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वाह, देवाचा आशीर्वाद लाभो” तर एका युजरने लिहिलेय, “आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत” आणखी एका युजरने लिहिलेय, “आणि त्या दिवशी त्याच्या आत एक मावळा जन्माला आला” एक युजर लिहितो, “शिवरायांचा मावळा” तर एक युजर लिहितो, “या मावळ्याचे धनी स्वतः कौतुक केल्याशिवाय राहणार नाही”
तिकोना किल्ला कुठे आहे?
तिकोना किल्ला पुण्यापासून ६० किमी अंतरावर कामशेतजवळ आहे. या किल्ल्याला वितंडगड सुद्धा म्हणतात. या किल्ल्यावरून पवना तलावाचे सुंदर दृश्य दिसते.