US Tourist Visa Apply: जर अमेरिकेमध्ये तुम्ही टुरिस्ट व्हिसा किंवा बिझनेस व्हिसावर असाल, तर प्रवाशी नोकरीसाठी अर्ज करण्याची आणि मुलाखतींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. फेडरल एजन्सीने म्हटले आहे की, वैयक्तिकरित्या प्रवास करणारे लोक नोकरीसाठी अर्ज करू शकतात. मात्र, नोकरी स्वीकारण्यापूर्वी त्यांना व्हिसाचे स्टेटस बदलून घ्यावे लागेल. तसे न केल्यास त्यांची नोकरी जाऊ शकते.
युएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस एजन्सीने(USCIS) आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अनेक लोकांनी त्यांना B1 आणि B2 व्हिसाच्या स्टेटवर नोकरीसाठी अर्ज करु शकतात का असे विचारले आहे, ज्याचे उत्तर होय आहे. हा व्हिसा तुम्हाला नवीन जॉब शोधण्यासाठी आणि मुलाखतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास अनुमती देईल.
नोकरी सोडल्यानंतर, 60 दिवसांच्या आत देश सोडणे आवश्यक आहे.
यूएससीआयएसने म्हटले आहे की, ”जेव्हा बिगर स्थलांतरितांना काढून टाकले जाते तेव्हा बहुतेक लोकांना त्यांच्या पर्यायांची माहिती नसते. त्यांना ६० दिवसांत देश सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही. अशा परिस्थितीत ते टुरिस्ट व्हिसावर नोकरी शोधू शकतात. बिगर स्थलांतरितांसाठी हा मोठा दिलासा आहे.”
‘महात्मा गांधी’, ‘मदर टेरेसा’ या दिग्गजांचा सेल्फी पाहिला का? AIच्या मदतीने आर्टिस्टने दाखवली झलक
हे काम 60 दिवसानंतरही अमेरिकेत राहण्यासाठी करावे लागणार
जर एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी गेली आणि त्याला 60 दिवसांनंतरही अधिकृतपणे अमेरिकेत राहायचे असेल तर त्याला काही पर्यायांतर्गत अर्ज करावा लागेल. यामध्ये गैर प्रवासी स्टेटसमध्ये बदल करण्यासाठी अर्ज करणे, एडजस्टमेंटसाठी अर्ज करणे, एम्प्लॉयर बदलण्यासाठी अर्ज करणे किंवा कोणत्याही समस्या निर्माण झाल्यास नवीन अधिकृत कर्मचारी दस्तऐवजासाठी अर्ज करणे समाविष्ट आहे.
पाकिस्तानी बिबट्याचा भारताच्या सीमेवर धुडगूस! तारेचं कुंपण ओलांडण्याचा थरारक Video पाहून व्हाल अवाक
नवीन नोकरी सुरू करण्यापूर्वी ही माहिती द्यावी
तुम्ही नवीन नोकरी सुरू केल्यास, तुम्ही तुमच्या व्हिसाच्या स्टेटसबद्दलस माहिती देऊ शकता.
यूएससीआयएस दिलेल्या माहितीनुसार, कोणताही नवीन रोजगार सुरू करण्यापूर्वी, एक याचिका आणि B-1 किंवा B-2 वरून रोजगार-अधिकृत स्थितीत बदलण्याची विनंती मंजूर करणे आवश्यक आहे आणि नवीन स्थिती प्रभावी असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, जर व्हिसाची स्थिती बदलली नाही किंवा बदल नाकारला गेला तर अशा लोकांना नोकरी सोडावी लागेल.