एखाद्याला कमकुवत सिद्ध करण्यासाठी ‘‘वो तो बिल्ली बन जाता है’ असे बोलतांना तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण अडचणींपासून दूर पळणारी मांजर तुम्ही कधी पाहिली आहे का? कदाचित नाही. कुत्र्यांना घाबरणारी मांजर तुम्ही बघितली असेल तर या व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये याच बरोबर उलट दिसत आहे. वन्यजीव मालिकेतील एक धाडसी मांजर पहा. ट्विटर पेजवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एका गल्लीत मांजर एकटी पाहून गल्लीतील सर्व कुत्रे तिच्यावर तुटून पडले. पण मांजरी घाबरली नाही.
मांजराचे धाडस
हा व्हिडीओ एका वस्तीतील रस्त्याचा असल्याचे दिसत आहे, जिथे एका मांजरीला पाहताच संपूर्ण परिसरातील सुमारे १०-१५ कुत्रे एकत्र आले आणि त्यांनी भुंकून आणि विरोध करत मांजरीला घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्यांना पाहून एकटी मांजर घाबरून पळून जाईल असे त्या कुत्र्यांना वाटले असेल, पण तसे झाले नाही. उलट एकटी राहूनही ती त्यांना तोंड देत राहिली. आणि त्याचे धाडस पाहून कुत्र्यांना त्याच्या जवळ जायची हिंमत झाली नाही.
(हे ही वाचा: “लोक स्वत:शीच लग्न करु लागली तर हिंदूंची लोकसंख्या कमी होईल”; भाजपा आमदाराचा ‘सोलोगॅमी’ला विरोध)
(हे ही वाचा: “माझ्या घरात पैसे…” खासदार असूनही IPL मध्ये का काम करतो? या प्रश्नावर गौतम गंभीर संतापला)
शेवटी काय झाले हे माहीत नसले तरी १० कुत्र्यांच्या बळासमोर मांजर बेधडकपणे उभी राहिली. तुमच्यात हिंमत असेल, तर अत्यंत कठीण प्रसंगांनाही सामोरे जाणे तुलनेने सोपे जाते, हे सांगण्यासाठी हा व्हिडीओही पुरेसा आहे. व्हिडीओला जवळपास ३ लाख व्ह्यूज मिळाले आहेत.