सोशल मीडियाची व्याप्ती किती मोठी आहे हे वेगळे सांगयला नको. एका क्लिकवर घरबसल्या जगभराची माहिती तुमच्यापर्यंत येऊन पोहचते. कित्येकांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा आपले काम, उत्पादन, व्यवसाय इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी या व्यासपीठाचा वापर केला आहे. फेसबुक तर यासाठी सगळ्यात उत्तम व्यासपीठ. आता हेच बघा ना केवळ एका फेसबुक पोस्टमुळे तोट्यात गेलेल्या हॉटेल मालकाचा व्यवसाय रातोरात सावरला आहे.
खर तर जगात ग्राहकाला देव मानले जाते. या देवानेच कॅनडाच्या एका भागात कित्येक वर्षांपासून तोट्यात चालेल्या हॉटेलला सावरले आहे. ६९ वर्षांच्या एका वृद्धव्यक्तीकडून कॅनडाच्या अल्टा भागात फिश अँड चिप्सचे हॉटेल चालवले जायचे. पण एकही ग्राहक या हॉटेलमध्ये फिरकायचा नाही. त्यामुळे तोट्यात चाललेल्या हॉटेलची आर्थिक बाजू सावरणे वृद्ध हॉटेल मालकाला कठीण जात होते. पण एके दिवशी दारूच्या नशेत ग्राहक येथे आला. तेव्हा हे हॉटेल पूर्ण रिकामी होते. एकच ग्राहक असला तरी या वृद्ध मालकाने त्याला चांगले जेवण आणि सेवा देऊ केली. त्यामुळे खुष झालेल्या या ग्राहकाने फेसबुकवर हॉटेलचे कौतुक करणारी पोस्ट लिहली. आणि काय आश्चर्य ही पोस्ट वाचून दुस-या दिवशी पासूनच त्या वृद्ध मालकाच्या हॉटेलबाहेर ग्राहकांनी गर्दी करायला सुरुवात केली. कित्येक वर्षांपासून तोट्यात गेलेले त्याचे हॉटेल सावरु लागले. कॉलीन रॉस असे या व्यक्तीचे नाव समजते.