भारतात द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू आहे. म्हणजेच, एखादा व्यक्ती एकाचवेळी दोन लग्न करू शकत नाहीत. दुसरं लग्न करण्याकरता पती किंवा पत्नीला पहिल्या जोडीदारापासून विभक्त व्हावं लागतं. तरच संबंधित व्यक्ती दुसरं लग्न करू शकते. परंतु, बिहारमध्ये अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका पतीला एक नव्हे, दोन नव्हे, १० नव्हे तर तब्बल ४० बायका आहे. बिहारमधील एका रेड लाईट विभागातील वॉर्ड क्रमांक सातमधील ४० बायकांनी आपल्या पतीचं नाव रुपचंद असं लावलं आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या जातीनिहाय जनगणनेदरम्यान ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना जानेवारी महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. बिहारच्या अरवल जिल्ह्यात अधिकारी जनगणना करण्यासाठी पोहोचले. अरवली जिल्ह्यातील रेड लाईट विभाग वॉर्ड क्रमांक सात येथे या अधिकाऱ्यांना एक धक्कादायक माहिती समजली. रेड लाईट विभागात गेल्या अनेक वर्षांपासून नाच-गाणे करून उदरनिर्वाह करणाऱ्या काही नृत्यांगना येथे राहतात. त्यांचं स्वतःचं हक्काचं ठिकाण नाही. यामुळे येथील महिला आपल्या पतीचं नाव रुपचंद लावतात.
हेही वाचा >> Viral Video : आईच्या चप्पलची कमाल! कपाटात लपलेल्या हट्टी मुलाला दाखवता त्याने ठोकली धूम
जनगणना करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “येथे अशा अनेक बायका राहतात ज्यांनी आपल्या पतीचं नाव रुपचंद लावलं आहे. तर, या बायकांच्या मुलांनीही आपल्या वडिलांचं नाव रुपचंद असल्याचं सांगितलं. परंतु, रुपचंद नावाचा इसम प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. त्याची सरकारी दरबारी कागदोपत्री नोंद नाही. तरीही येथील महिलांनी आपल्या पतीचं नाव रुपचंद असं लावलं आहे. रुपचंद नाव हे प्रातनिधिक नाव आहे. अशा नावाचा व्यक्तीच अस्तित्वात नाही.”
बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना
बिहारमधील नितीश कुमार सरकारने ७ जानेवारीपासून जातिनिहाय जनगणना सुरू केली आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी तब्बल ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जातीनिहाय जनगणनेला विरोध असतानाही ही गणना सुरू करण्यात आली आहे.