जगभरातील अनेक कंपन्यांनी मागील काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत घरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये मेटा, ट्विटर, ॲमेझॉन यांसारख्या अनेक ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. या नोकरकपातीमुळे कर्मचारी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण नोकरी गेल्यामुळे अनेकांना मोठी पैशाची चणचण भासते.
मात्र, याच नोकरी गमावलेल्यांसाठी आता एक महत्वपुर्ण संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे नोकरी गेली असली तरी, ज्यांना आपल्या बुद्धीमत्तेवर विश्वास आहे, त्यांना घरबसल्या एका झटक्यात ८१ लाख रुपये कमावण्याची नामी संधी एका कंपनीने उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त एक युनिक अशी स्टार्टअप आयडिया कंपनीला द्यावी लागणार आहे.
आणखी वाचा- १ कोटी ७० लाखांना विकल्या गेल्या ‘या’ सॅण्डल्स; जाणून घ्या यामागील नेमकं कारण काय?
तुम्हाला लखपती बनण्याची संधी देणारी कंपनी अमेरिकेतील असून तिचं नाव ‘डे वन वे वेंचर्स’ (Day One Ventures) असं आहे. तर या कंपनीच्या संस्थापकाचे नाव मासा बुशर असं आहे. मासा बुशर यांना देखील मंदीचा फटका बसल्यामुळे त्यांना दोन वेळा कामावरुन कमी करण्यात आलं होते. मात्र, त्यांनी नोकरी गेल्यावर खचून न जाता ‘वेंचर कैपिटल फर्म डे वन वेंचर्स’ची सुरुवात केली सध्या ती कंपनी अनेक नवउद्योजकांना प्रोत्साहीत करत आहे.
“आमच्या कंपनीकडे अब्जावधी डॉलर आहेत. आम्ही नोकरकपातीमुळे नोकरी गमवावी लागलेल्या प्रतिभावान इंजिनीअर्स, सपोर्ट स्टाफसह अनेक हुशार आणि कल्पक लोक चांगल्या नोकरीची वाट पाहत आहेत. त्यांच्यामधील काही लोकांना आपण संधी देणार असून त्यांना त्याचा मोबदला देणार आहे. शिवाय त्यांच्याोबत केला जाणारा हा व्यवहार आम्हाच्यासाठी देखील फायद्याचा असेल” असं संस्थापक मासा बुशर यांनी सांगितलं आहे.
काय आहे ही नामी संधी ?
आणखी वाचा- २१ तोफांची सलामी! बँकेतील पैसे डिपॉजिट स्लिपवर लिहिलेला मजकूर पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू
डे वन वेंचर्स कंपनीने ‘Funded Not Fired’ उपक्रमाद्वारे अनेकांना लखपती बनवण्याची संधी उपलब्ध केली आहे. या कंपनीकडून असं सांगण्यात आलं आहे की, “आम्हाला जो कोणी एक उत्तम आणि युनिक अशी स्टार्टअप आयडिया (Startup Idea) देईल आणि जर तुम्ही दिलेली आयडिया कंपनीला आवडली तर तुमच्या अकाउंटमध्ये थेट एक लाख डॉलर म्हणजेच जवळपास ८१ लाख रुपये पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्यांना आपल्या बुद्धीमत्तेवर विश्वास आहे अशा लोकांनी ही नामी संधी गमवू नये,” असं देखील कंपनीने आवाहन केलं आहे.