संयुक्त राष्ट्र निर्वासित एजन्सीने गुरुवारी सांगितले की रशियाच्या हल्ल्यानंतर दहा लाख लोकांनी युक्रेन सोडले आहे. या शतकात यापूर्वी कधीच इतक्या वेगाने स्थलांतर झाले नव्हते. युनायटेड नेशन्स हाय कमिशन फॉर रिफ्युजी (UNHCR) च्या आकडेवारीनुसार, स्थलांतरितांची संख्या युक्रेनच्या लोकसंख्येच्या दोन टक्क्यांहून अधिक आहे. जागतिक बँकेच्या मते, २०२० च्या शेवटी युक्रेनची लोकसंख्या ४ कोटी ४० लाख इतकी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एजन्सीचा अंदाज आहे की सुमारे ४० लाख लोक युक्रेनमधून पलायन करू शकतात आणि ही संख्या जास्तही असू शकते. यूएनएचसीआरचे प्रवक्ते जोंग-आह घदीनी-विलियम्स यांनी एका ईमेलमध्ये लिहिले की, राष्ट्रीय अधिकाऱ्यांच्या गणनेनुसार, आमच्या आकडेवारीतून असे दिसून येते की मध्य युरोपमध्ये आम्ही मध्यरात्री दहा लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

Video: “आता आपल्या मातृभूमीत परतण्याची वेळ…” युक्रेनमधून भारतीयांना परत आणणाऱ्या विमानाच्या पायलटचे भावुक संबोधन

संयुक्त राष्ट्र उच्चायुक्त फिलिपो ग्रँडी यांनी ट्विट केले की, ‘आम्ही फक्त सात दिवसांत युक्रेनमधून शेजारच्या देशांमध्ये १० लाख लोकांचे स्थलांतर पाहिले आहे’. युक्रेन सोडणाऱ्या या लोकांमध्ये समाजातील दुर्बल घटकातील लोकांचा समावेश आहे, जे स्वतः स्थलांतराचा निर्णय घेऊ शकत नाहीत आणि त्यांना त्यांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे.

बुधवारी, २०० हून अधिक अपंग युक्रेनियन, जे युक्रेनियन राजधानी कीवमधील दोन निवारागृहांमध्ये राहत होते, ते हंगेरियन शहर जाहोनी येथे आले. या निर्वासितांमध्ये अनेक लहान मुलांचा आणि मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या दुर्बल लोकांचा समावेश आहे, ज्यांना रशियन हल्ल्यामुळे आश्रय केंद्र सोडून देश सोडावा लागला.

Ukraine War: रशियन मांजरांच्या विदेशगमनास बंदी; ‘हे’ आहे कारण

कीवमधील स्व्याटोशिंक्सी अनाथाश्रमाच्या संचालिका लॅरिसा लिओनिडोव्हना म्हणाल्या, ‘तेथे राहणे सुरक्षित नाही. रॉकेट पडत होते. ते कीववर हल्ला करत होते. बॉम्बस्फोटादरम्यान आम्ही अनेक तासांपेक्षा जास्त वेळ भूमिगत ठिकाणी घालवला.’

प्राथमिक आकडेवारीनुसार, युक्रेनमधील निम्म्याहून अधिक निर्वासित म्हणजेच सुमारे ५,०५,००० लोक पोलंडमध्ये गेले आहेत, १,१६,३०० हून अधिक लोक हंगेरीमध्ये आणि ७९,३०० हून अधिक लोकांनी मोल्दोव्हामध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय ७१,००० लोक स्लोव्हाकियामध्ये गेले आहेत आणि सुमारे ६९,६०० लोक इतर युरोपीय देशांमध्ये गेले आहेत.