प्रत्येक व्यक्ती सुखी आणि सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी धडपडत असतो पण आपली एक चूक आपले आयुष्य खराब करू शकते. मौज-मज्जा करणे, मस्ती करणे हा आयुष्यातील खरा आनंद आहे पण कोणत्याही गोष्टीची एक मर्यादा असते त्या मर्यादा ओलांडल्यानंतर होत्याचा नव्हते व्हायला फारसा वेळ लागत नाही. अनेकदा मज्जा मस्ती करताना नकळतपणे झालेली एक चूक एखाद्याचा जीवावर बेतू शकते. विशेषतः तरुण वयात अशा चूका होतात. मित्रांबरोबर मज्जा मस्ती करताना अनेकदा हे तरुण सर्व मर्यादा ओलंडतात आणि स्वत:बरोबर इतरांचा जीव धोक्यात टाकतात. सोशल मीडियावर अशाच एका घटनेची प्रचिती देणारा व्हिडिओ चर्चेत आला आहे ज्यामध्ये स्विमिंग पुलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले आहेत.

व्हायरल व्हिडीओएका वॉटर पार्कमधील आहे जिथे स्विमिंग पुल, घसरगुंडीसह अनेक गोष्टींचा आनंद घेण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण उत्सूक असतात. अशा ठिकाणी मज्जा मस्ती करताना थोडी सावधगिरी देखील बाळगावी लागते अन्यथा एक चूक एखाद्याचा जीव धोक्यात टाकू शकते.

व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की काही तरुण वॉटर पार्कमधील स्विमिंग पुलमध्ये मज्जा मस्ती करताना दिसत आहे. पण मज्जा मस्ती करता करता हे तरुण स्विमिंग पुलमध्ये स्टंटबाजी करताना दिसत आहे. एक तरुण घसरगुंडीसमोर उभा राहिला जिथे उंचावरून काही लोक भरधाव वेगाने घसरत स्विमिंग पुलमध्ये उतरत आहे. जसजसे एखादी व्यक्ती खाली येते तसा तो बाजूला होत आहे पण अशा परिस्थितीत कोणीही व्यक्ती घसरगुंडीवरून घसरत येणार्‍या व्यक्तीच्या समोर आली तर मोठा अपघात होऊ शकतो. तीच चूक हा तरुण करत आहे. चुकूनही तरुणांचा अंदाज चुकला अन् अपघात झाला तर एखाद्याचा जीव जावू शकतो. व्हायरल व्हिडिओ पाहताना अंगावर काटा येत आहे.

हेही वाचा – “पुणेकरांच्या नादाला लागू नये!”, बेशिस्त दुचाकी चालकाला सायकल घेऊन भिडले पुणेरी काका, Viral Video बघाच…

हेही वाचा – Video : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर भक्तांची भली मोठी रांग

व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एकाने कमेंट केली की,”किती भयंकर लोक आहे ते”

दुसऱ्याने कमेंट केली “एकदा धडकला तर…”

तिसऱ्याने कमेंट केली की,”जर चूकूनही धडक झाली तर त्याचे तोंड फुटेल, घसरगुंडीवरून येणाऱ्या व्यक्तीला गंभीर दुखापत होईल”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One mistake and the game is over young mans unnecessary stunt in the swimming pool viral video will make you shiver snk