Viral video: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून धावणारी लालपरी म्हणजेच एसटी बस महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी अत्यंत सोयिस्कर आणि खिशाला परवडणारी सार्वजनिक वाहतूक सुविधा आहे. गावाच्या कानाकोपऱ्यातून लोक विविध शहरात किंवा तीर्थस्थानी भेट देण्यासाठी एसटी बसचा वापर करतात. पण वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत एसटी बसची संख्या कमी पडते आहे त्यामुळे प्रवाशांना गर्दीमध्ये उभे राहून प्रवास करावा लागतो. अशा स्थितीमध्ये अनेकदा जागा मिळण्यासाठी लोक काहीही करतात. कधी कोणी खिडकीतून पिशवी टाकते तर कधी कोणी थेट खिडकीतूनच एसटीबसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करते.

असाच एक मुलगा एसटी बसमध्ये जागा पकडण्यासाठी खिडकीतून चढण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी त्या बसची खिडकी तुटून मुलगा खाली कोसळला. त्यानिमित्ताने राज्यातील एसटी बसेसची दुरवस्थाही समोर आली आहे. दरम्यान, असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये एक तरुण एसटी बसमध्ये सीट पकडण्यासाठी खिडकीतून बसमध्ये जाताना खिडकीच त्याच्या हातात आली आहे. अशाप्रकारे दोन प्रकरणं समोर आली असताना आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र यावेळी कुणी तरुण नाही तर चक्क एक आजोबा एसटीच्या खिडकीत शिरले आहेत. यावेळी पुढे काय होतं हे तुम्हीच पाहा.

The little girl dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, चिमुकलीने भररस्त्यात केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Pakistan International Airlines Flight
पाकिस्तानच्या विमानाने तुम्ही कधी प्रवास केलाय का? प्रवाशाने शेअर केलेला Video पाहून तुमचीही झोप उडणार!
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
anganwadi worker cross the flooded river video goes viral
Video : पूर आलेली नदी ओलांडण्यासाठी अंगणवाडी सेविकेने काय केले?
Lalbaugcha raja 2024 darshan mumbai devotees get pushed shoved at lalbaugcha raja amid stampede like situation
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताय? ‘हा’ VIDEO पाहा अन् तुम्हीच सांगा चूक भाविकांची की कार्यकर्त्यांची?
a man helped women to cross the road | Viral Video
माणसं ओळखायला आपण चुकतो! ज्याला जग वेडा समजत होते तोच खरा शहाणा निघाला; VIDEO एकदा पाहाच

खिडकी नाही तुटली तर काय झालं पाहा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आजोबा एसटीच्या खिडकीतून सीट पकडण्यासाठी आतमध्ये शिरत आहेत. गेल्या दोन प्रकरणांमुळे पुन्हा एकदा खिडकीचं काही होतंय का असं सगळ्यांना वाटत होतं मात्र आजोबा अगदी पद्धतशीरपणे खिडकीतून आतमध्ये शिरले. यावेळी उपस्थित सगळेच बघायला लागले.यावेळी एक व्यक्ती मागून या आजोबांना आतमध्ये जाण्यासाठी मदत करत आहेत.बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर हे आजोबा एसटीमध्ये शिरले आणि जागा पकडलीच. हा व्हिडीओ पाहून आता तुम्हीच सांगा या प्रकरणात नेमकी चूक कोणाची आहे?

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: बापरे! पाऊस सुरु होता, ​तो फोनवर बोलत होता अन् वीज कोसळली, क्षणात जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही

“आजोबा जोमात महामंडळ कोमात”

हा व्हिडीओ majalgaon_cha_statuswala या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “आजोबा जोमात महामंडळ कोमात” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. त्यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने म्हटले आहे, “काचच नाही राव त्या खिडकीला.” आणखी एक युजर म्हणतो, “त्यांची काय चूक नाहीये. याला एसटी महामंडळ जबाबदार आहे. काम मजबूत नव्हते.”