अनेकदा आपण जेव्हा दुकानातून अंडी आणतो तेव्हा काही अंडी वेगळी दिसतात. काही छोटी असतात तर काहीमध्ये रंगाचा फरक जाणवतो. अगदी अशाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही व्हिडीओ शेवटी आश्चर्याचा धक्का देतात आणि लोकांना थक्क करून सोडतात. अंड्यांनी भरलेल्या एका वाडग्याचा हा व्हिडीओह तसाच आहे. या व्हिडीओच्या शेवटी एक मोठा ट्विस्ट दिसतो जो पाहून लोक आपलं हसू आवरणार नाहीत.

हा व्हिडीओ अभिनेता झेकिट्टा यांनी त्याच्या पर्सनल इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पण इन्स्टा पेजवर हा व्हिडीओ पुन्हा शेअर केल्यानंतर व्हिडीओने लोकांचे लक्ष वेधून घेतले. “मी ते पाहू शकत नाही,” असं लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. कदाचित या व्हिडीओचा शेवट पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा हेच म्हणाल. या व्हिडीओची सुरूवात एका वाडग्यात ठेवलेल्या अंड्यापासून होते. एका वाडग्यात सर्व अंडी एकसारखी दिसून येत आहेत. पण अंड काहीसं वेगळं दिसतं. इतर अंड्याचा रंग वेगळा दिसून येतोय. सर्वांचं लक्ष या वेगळ्या अंड्यान वेधून घेतलं. मात्र हे अंड असं इतर अंड्यापेक्षा वेगळं का दिसत असेल, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर यासाठीची तुमची उत्सुकता आणखी न वाढवता हा व्हिडीओ तुम्हीच प्रत्यक्ष पाहा.

आणखी वाचा : उकडलेले अंडे सोलण्याची ही अनोखी आयडिया पाहून हैराण व्हाल! पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : फणा काढून उभा असलेल्या किंग कोब्राच्या माथ्यावर केलं कीस; VIRAL VIDEO पाहून अंगावर काटा येईल

या व्हिडीओच्या शेवटी जो ट्विस्ट दिसून आला ते पाहून लोक अक्षरशः पोट धरून हसू लागले आहेत. या व्हिडीओने लोकांना काही मिनिटांसाठी बुचकळ्यात पाडलं होतं. मात्र हे अंड इतरांपेक्षा वेगळं का दिसतं याचं कारण कळल्यानंतर मात्र लोकांना हसू आवरता येत नाहीय. हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय.

काही दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. शेअर केल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. आत्तापर्यंत व्हिडीओला ५.२ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे आपल्या जवळच्या नातेवाईकांना आवर्जून पाठवत आहेत.

Story img Loader