Accident video viral: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘भारतातील रस्ते अपघात २०२२’संबंधी वार्षिक अहवाल मंगळवारी (३१ ऑक्टोबर) प्रकाशित केला. या अहवालानुसार रस्ते अपघात रात्री नाही, तर दिवसाढवळ्या अधिक होतात. खड्डेमय रस्त्यांपेक्षा सरळमार्गी महामार्गावर अधिक अपघात झाले आहेत.रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक दिल्लीच्या रस्त्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे.
बसवरील नियंत्रण सुटलं अन्..
दिल्लीतील रोहिणी भागात डीटीसी बसने तब्बल १२ वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका ३० वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यूही झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आरोपी चालक संदीप हा रोहतकचा रहिवासी असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
चालकाला घेतलं ताब्यात
डीसीपी (रोहिणी) गुरिकबाल सिद्धू यांच्या म्हणण्यानुसार, हा अपघात मदर डिव्हाईन स्कूलजवळ झाला आणि पीसीआर कॉल मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना कळले की जखमी व्यक्तींना बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तेथे पोहोचल्यावर माहिती मिळाली की एका ३० वर्षीय व्यक्तीला मृत घोषित करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, डीटीसी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यानंतर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: गिझरचा वापर करता? काळजी घ्या! नाहीतर…९० टक्के लोक करतात ही चूक; तरुणीनं सांगितला अनुभव
सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @ANI च्या अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.